जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झालेली असताना त्यामध्ये महायुतीतील व अन्य बंडखोरांनी देखील आपली अपक्ष उमेदवारी दाखल करून उसळी घेतल्याचे दिसून आले. दरम्यान शिवसेना-भाजपा महायुतीसह उध्व ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या स्वतंत्र उमेदवारांसह अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू असल्याने प्रशासनाकडून दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही. राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करून यश मिळाल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उध्व बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडी झालेली नाही त्यातच ओबीसी बहुजन विकास आघाडीने या निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करण्याचा निर्णय प्रदेश स्तरावरून घेतल्याने तिरंगी किंबहुना चौरंगी लढती होण्याची शक्यता दिसत आहे. काँग्रेसने काही जागांवरच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून अन्य ठिकाणी काँग्रेसच्या मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी आणि पंचायत समितीच्या बारा गणांसाठी निवडणूक होत आहेत. या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार अंतीम दिवस होता. यामध्ये शिंदे शिवसेना आणि भाजपा महायुतीकडून जिल्हा परिषदेच्या वडदहसोळ गटासाठी माजी पंचायत समिती सदस्य प्रतिक मटकर (शिवसेना), जुवाठी गटासाठी रमेश सूद (शिवसेना), धोपेश्वर गटासाठी माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश कुवळेकर (शिवसेना), साखरीनाटे गटासाठी कोमल नवाळे (शिवसेना), कातळी गटासाठी सोनाली टुकरूल (शिवसेना), तळवडे गटासाठी सिद्धाली मोरे (शिवसेना) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर पंचायत समितीसाठी धोपेश्वर गणासाठी अभिजीत गुरव (भाजपा), वडदहसोळ गणासाठी गौतम जाधव (शिवसेना), रायपाटण गणासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती उमेश पराडकर (शिवसेना), तळवडे गणासाठी अपेक्षा मासये (शिवसेना), ताम्हाणे गणासाठी समिक्षा वाफेलकर (शिवसेना), केळवली गणासाठी पंचायत समितीच्या माजी उपसभापती भाग्यश्री लाड (शिवसेना), जुवाठी गंणासाठी प्रसाद मोहरकर (शिवसेना), पेंडखळे गणासाठी राजेश गुरव (शिवसेना), नाटे गणासाठी सुवर्णा बांदकर (भाजपा), साखरीनाटे गणासाठी स्पृहा गुरव (शिवसेना), अणसुरे गणासाठी जान्हवी गावकर (शिवसेना), कातळी गणासाठी पंढरीनाथ मयेकर (शिवसेना) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
उध्व बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून जिल्हा परिषदेच्या वडदहसोळ गटासाठी राजेश चव्हाण, तळवडे गटासाठी समिक्षा चव्हाण, जुवाठी गटासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश जैतापकर, धोपेश्वर गटासाठी पंचायत समितीचे माजी सभापती अभिजीत तेली, साखरीनाटे गटासाठी माजी पंचायत समिती सदस्य नलिनी शेलार, पंचायत समितीच्या वडदहसोळ गणासाठी माजी पंचायत समिती सदस्य विनोद शिंदे, रायपाटण गणासाठी विश्वनाथ लाड, तळवडे गणासाठी भामिनी सुतार, ताम्हाणे गणासाठी योगी डांगे, केळवली गणासाठी छाया कोकाटे, जुवाठी गणासाठी माजी पंचायत समिती सदस्य दिवाकर मयेकर, पेंडखळे गणासाठी गणेश बाईंग, धोपेश्वर गणासाठी कृष्णा नागरेकर, अणसुरे गणासाठी दीपाली मेढेकर, कातळी गणासाठी अजय काशिंगकर, नाटे गणासाठी नमिता नागले, साखरीनाटे गणासाठी अश्विनी शेगुळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसकडून धोपेश्वर गणातून सिद्धेश मराठे, केळवली गणातून वैष्णवी कुळ्ये, साखरीनाटे गणातून अलमिनाब म्हसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

