23.7 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriगणेशोत्सवाच्या काळात मतदारांशी सलोखा, आरतीसंग्रहासह पूजा साहित्याचे वाटप

गणेशोत्सवाच्या काळात मतदारांशी सलोखा, आरतीसंग्रहासह पूजा साहित्याचे वाटप

सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

कोकणात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून लाखो चाकरमानी गावात आलेले आहेत. गौरी-गणपती विसर्जन झाले असले तरीही अनंत चतुर्दशीपर्यंत उत्सव सुरू राहणार आहे. या निमित्ताने लोकप्रतिनिधीही घरोघरी जात आहेत. या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची तयारी हा छुपा उद्देश आहेच. काहींनी तर आरतीसंग्रहाचे पुस्तकामधून कार्य अहवाल लोकांपर्यंत पोचवला आहे. गणेशोत्सवात मतदारांशी सलोखा साधण्याचे काम जोरदार सुरू आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

कोकणात गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने मुंबईत असलेले चाकरमानी हमखास गावागावांत दाखल होत असतात. त्यामुळे गावे गजबजून गेलेली असतात. लोकांपर्यंत पोहोचणे राजकीय पक्षांमधील इच्छुक उमेदवारांना सहजशक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात इच्छुक उमेदवार आणि नेतेमंडळींनी प्रचारासाठी गणेशोत्सवातील या वातावरणाचा उपयोग केला आहे. मतदारांपर्यंत पोचण्याचा राजकीय पक्षाचा प्रयत्न सफल झाला आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयरीत असलेल्या अधिकाधिक इच्छुकांनी यावर्षी आरतीसंग्रह प्रसिद्ध करून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी वाटप केला आहे.

या आरतीसंग्रहात गेल्या पाच वर्षांत केलेल्या विविध कार्याचा अहवाल सचित्र छापलेला आहे. काहींनी २०२४ च्या निवडणूक व्हिजन या माध्यमातून मतदारांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. रोजगार निर्मितीची क्षमता असूनही पुरेपूर वापर करून युवकांना रोजगार मिळण्यासाठी धोरणे आखली गेली नाहीत. त्या दृष्टीने आगामी काळात पावले उचलण्याची ग्वाही दिली जात आहे. घरोघरी वाटप होत असलेल्या साहित्यांमध्ये अगरबत्ती, धूप, कापूर आणि मध अशा वस्तू आहेत. त्यामध्ये स्वतःचे छायाचित्र आणि मतदार संघाचा उल्लेख असलेला स्टिकर लावून त्याचेही घरोघरी वाटप सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular