27.9 C
Ratnagiri
Monday, September 26, 2022

खेड तालुक्यातील राज्य पशुसंवर्धन खात्याच्या १७ दवाखान्यांची स्थिती बिकट

राज्यात सध्या जनावरांवर लंपी त्वचा रोगाचा फैलाव...

नवरात्रीचे औचित्य साधून, महिलांसाठी एक खास अभियान

आज २६ सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला...

रत्नागिरी पोलिसांनी दोन दिवसांत गोव्यातून चोरांच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. रत्नागिरी...
HomeKhedखेडेकर यांनी केलेल्या घोटाळ्याच्या पैशाची शासनाने वसुली करावी, पत्रकार परिषदेत सेनेची मागणी

खेडेकर यांनी केलेल्या घोटाळ्याच्या पैशाची शासनाने वसुली करावी, पत्रकार परिषदेत सेनेची मागणी

खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर कार्यरत असताना गैरवर्तन, अनियमितता व कर्तव्यात कसूर केलेली असल्याची तक्रार करण्यात आली आहे

कोकणातील मनसेची एकमेव निवडून आलेली जागा म्हणजे खेड नगराध्यक्ष पदी निवडून आलेले वैभव खेडेकर. परंतु, खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर कार्यरत असताना गैरवर्तन, अनियमितता व कर्तव्यात कसूर केलेली असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना नगरविकास खात्याने सहा वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. पदाचा गैरवापर केल्याचा खेडेकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

शिवसेनेच्या नगरसेवकांनी खेडेकर यांनी येथील नगर परिषदेच्या कारभारामध्ये भ्रष्टाचार केल्याचा कथित आरोप ठेवून जिल्हाधिकारी व वरिष्ठ स्तरावर केलेल्या तक्रारीमुळे मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. नगर विकास विभागाच्या सचिवांनी खेडेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून आगामी १५ दिवसांत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

जनतेने विश्‍वासाने निवडून दिल्यानंतर नगराध्यक्षाने केलेल्या घोटाळ्याच्या पैशाची शासनाने वसुली करावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख निकेतन पाटणे यांनी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला शिवसेना तालुका प्रमुख विजय जाधव, राजुशेठ बुटाला, पं.स. माजी सभापती विजय कदम, माजी शहर प्रमुख संजय मोदी, मिनार चिखले, सुनिल धामणस्कर, महिला आघाडीच्या संपदा गुजराथी, उपस्थित होते.

शिवसेनेचे गटनेते प्रज्योत तोडकरी, उपनगराध्यक्ष सुनिल दरेकर, सदस्य नगरसेवक प्रशांत कदम, सुरभी धामणस्कर, रूपाली खेडेकर, अल्पिफा पाटणे, मनिषा निर्मल, नम्रता वडके, सीमा वंडकर या नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी वैभव खेडेकर यांच्या विरोधात तक्रार करून केलेल्या घोटाळ्याची चौकशी करून त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. या कामी शिवसेनेचे माजी पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम आणि विद्यमान आमदार योगेश कदम यांनीही या मागणीचा शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता.

RELATED ARTICLES

Most Popular