30 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

जिल्ह्यात सरासरी ६४ टक्के मतदान, प्रक्रिया शांततापूर्ण

सकाळच्या सत्रापासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यानंतर...

भाजप ठरवणार निकाल की ‘निक्काल’, चाकरमानीही ठरणार प्रभावी

विधानसभेसाठी जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत झालेले मतदान हे...

दापोलीत उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

दापोली विधानसभा मतदारसंघात ६० टक्के मतदान झाले...
HomeCareerटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरमध्ये विविध पदांची भरती

टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरमध्ये विविध पदांची भरती

टाटा रिसर्च सेंटरमध्ये भरती, पदभरतीचा तपशील जाणून घ्या

टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

मुंबईतील टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेत ज्युनियर हिंदी अनुवादक (Jr. Hindi Translator), प्रयोगशाळा सहाय्यक बी (Laboratory Assistant B), सुरक्षा रक्षक (Security Guard), ग्रंथालय प्रशिक्षणार्थी (Library Trainee and Temporary Work Assistant) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पद भरती शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव –

ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असावे आणि संबंधित कामाचा किमान अनुभव असावा.

लॅबोरीटी असिस्टंट बी

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून एसएससी किंवा सीएमएलटीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असावे. यासोबतच संबंधित कामाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.

सिक्युरीटी गार्ड

या पदासाठी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवारांकडे या कामाचा किमान अनुभव असावा.

ग्रंथालय प्रशिक्षणार्थी

या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतून डिग्री पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कामाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.

पद भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे –

उमेदवारांनी रेझ्युम,  दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट https://www.tifr.res.in/

१२ मार्च २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज प्रशासकीय अधिकारी (डी), रिक्रूटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १, होमी भावा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई- ४००००५ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

PDF जाहिरात

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. सर्व मराठी मुलांना वरील जाहिरात पाठवावी जेणेकरून आपल्या मराठी मुलांना चांगली संधी मिळेल.

RELATED ARTICLES

Most Popular