26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriरिफायनरी प्रकल्पाचं समर्थन नाही! काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

रिफायनरी प्रकल्पाचं समर्थन नाही! काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

राजापूरमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टपणे मांडली. रत्नागिरीदौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपचे कृत्य सर्वाना कळलेले आहे. भाजपने २ भाग पाडलेले आहेत. भय. आणि भ्रष्टाचार त्या माध्यमातून घाणेरडे कृत्य ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून केले जात आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जे पाप घडले आहे. त्याचे परिणाम भाजपला येणाऱ्या काळात भोगावे लागतील. महाराष्ट्राची जनता त्यांना जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही, असे नाना पटोले यावेळी म्हणाले. दरम्यान जे कोणी काँग्रेसबरोबर उभे असतील त्यांना सोबत घेऊन चालू, ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी ही कायम राहील. विरोधी पक्षनेत्याबाबत बसून निर्णय होईल, आत्तापासून आततायीपणा राष्ट्रवादीने करू नये. असा सल्ला देखील नाना पाटोले यांनी यावेळी दिला. तसेच ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा यांची चाचणी काँग्रेसं करत आहे. महाराष्ट्रातील मूळ पक्ष काँग्रेसच, ही चाचणी आम्ही लपून नाही तर जाहीरपणे करतो आहोत. तसेच मित्रपक्षाला सुद्धा ताकद देण्याचे काम आम्ही करू असं नाना पटोले यावेळी म्हणाले. रिफायनरी प्रकल्पाचं समर्थन नाही निसर्गाचे नुकसान असेल तिथे प्रकल्पाचे समर्थन काँग्रेस करणार नाही. कोकणातल्या निसर्गाला धोका पोहोचवून आम्ही कधीच रिफायनरी कल्पाचं समर्थन करणार नाही असे नाना पटोले यावेळी म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular