25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्ह्यात पावसाने नऊ लाखांचे नुकसान...

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने नऊ लाखांचे नुकसान…

जिल्ह्यात गेले दोन दिवस पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. त्यामुळे सुमारे ९ लाखांचे नुकसान झाले आहे. यामध्ये घरांचे, विहिरींचे, गोठ्यांचे नुकसान झाल्याचे प्रकार सर्वाधिक आहेत. जिल्ह्यात बिपरजॉय चक्रीवादळामुळे मॉन्सून उशिरा सक्रिय झाला. मात्र त्यानंतर मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीच्या कामांना वेग आला आहे. गेले दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड झाली असून रस्ते खचल्याने वाहतुकीलाही फटका बसला आहे. जिल्ह्यात पावसामुळे ९ लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये मंडणगड तालुक्यातील कुडुक बुद्रुक येथील सचिन तांबे आणि भारती तांबे यांच्या घराचे नुकसान झाले आहे. दापोलीतील हर्णे येथील नामदेव भोईणकर यांच्या घराशेजारील संरक्षण भिंत अतिवृष्टीमुळे पडून अंदाजे रुपये १५ हजार रुपये, शिरसोली येथील हिराबाई महाडिक यांच्या घरावर झाडाची फांदी पडून ७ हजार ५५५ रुपये, बोडिवली येथील दत्ताराम गुरव यांच्या गोठ्याचे ३७ हजार ५००, दाभोळे येथील संदेश करंबेळे यांच्या घराशेजारील संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले आहे.

खेडमधील मुंबके येथील सालेकरवाडीतील जिल्हा परिषद सार्वजनिक विहिरीचे बांधकाम अतिवृष्टीमुळे कोसळले. त्यामुळे ५ लाखाचे नुकसान झाले आहे. सवेणी येथील श्रीपत पवार यांच्या घराचे रुपये ३ हजार २००, सर्वणी येथील सीताबाई दळवी यांच्या घराचे अंशतः ६० हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे. चिपळूणमध्ये हिना शिगवण यांच्या गोठ्याचे २६ हजार, पालशेत येथील सार्वजनिक शौचालयाचे ३ हजार रुपये, मासू येथील शैलेश चिले यांच्या घराचे ४ हजार ८०० रुपयाचे नुकसान झाले. गुहागर-चिपळूण-कराड मार्गावर ट्रकचा टायर फुटल्यामुळे पहाटे ५ वाजल्यापासून एकेरी वाहतूक सुरू होती.

सकाळी ८ नंतर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाली आहे. संगमेश्वर नावडी येथील ज्योती गुरव यांच्या घराचे दीड लाख, भडकंबा – बेर्डेवाडी येथील रवींद्र बेर्डे यांच्या घराशेजारील विहीर मुसळधार पावसाने खचून अंदाजे २५ हजार रुपये, जयगड येथील सुनंदा घाणेकर यांच्या घराचे ९४ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले. रत्नागिरीतील वरवडे-खारवीवाडा येथील विकास पालशेतकर यांच्या घराचे ४ हजाराचे नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular