23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKokanरिफायनरी प्रकल्प कोकणातच होणार-आ.उदय सामंत

रिफायनरी प्रकल्प कोकणातच होणार-आ.उदय सामंत

कोकणातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध हळूहळू कमी होत असून, या ठिकाणी कामे सुरू झाली आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये आठ ते दहा बोर मारून झाले असून ३२ लोकांनी समिती पत्रे दिलेली आहेत. शेतकऱ्यांना जी काही भीती वाटते किंवा त्यांच्या ज्या काही शंका आहे त्या दूर करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे काही झाले तरी कोकणामध्ये रिफायनरी प्रकल्प होणारच असा दावा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

कोको कोला ही जगप्रसिद्ध शीतपेयाची कंपनी आता रत्नागिरीतील लोटे परशुराम येथे आपला प्रकल्प उभारत आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे. लोटे परशुराम वगळता जास्तीत जास्त एमआयडीसीमध्ये आता उद्योजक येऊ लागले आहे. केंद्र सरकारचा कोच बनवण्याचा कारखाना सुद्धा या एमआयडीसीत येतो आहे. रत्नागिरीतला एमआयडीसीमध्ये नवनवीन प्रकल्प यावे. जे आहेत ते अधिक नेटाने सुरू रहावेत यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

रायगड जिल्ह्यातही वेगवेगळ्या प्रकल्पांची सुरुवात झाली आहे. रायगडमध्ये बीडीपी हा प्रकल्प रद्द झाला असे, म्हटले जात होते. मात्र, तो आम्ही पुन्हा नव्याने सुरू करीत आहोत. सीनोरमस कंपनीचा वीस हजार कोटी रुपयांचा प्रकल्प येत आहे. महाराष्ट्रातील कौशल्य विकास विद्यापीठातील पहिले केंद्र पनवेल येथे सुरू होत, असून त्याचे भूमिपूजन नुकतेच झाले आहे. ५००० कोटी रुपयांचा विद्युत प्रकल्प जिंदालच्या वतीने कोकणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता कोकणामध्ये नवनवीन प्रकल्प येत आहेत.

कोकणातील दापोली येथे सुमारे ५०० एकर जमिनीवर प्रत्येकी दोनशे दोनशे कोटी रुपये प्रकल्प किंमत असलेल्या मरीन पार्क आणि मँगो पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. कोकणातल्या आंबा बागायतदारांसाठी अतिशय उपयुक्त असा हा प्रकल्प होणार असून याच्यामध्ये आंब्यापासून उपपदार्थ तयार करण्यात येणार आहेत. तसेच काजू बोंड प्रक्रिया केंद्र हे सुद्धा उभारण्यात येत आहे. या ठिकाणी मोठे मरीन पार्क उभारण्यात येणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय करणाऱ्या बांधवांना चालना देण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणात येत्या काही महिन्यात हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू होत आहेत. राज्याबाहेर एखादा प्रकल्प गेला म्हणून आरडाओरड करण्यापेक्षा राज्यात किती नवीन प्रकल्प सुरू होत आहेत, याची दखल विरोधी पक्षांनी घ्यावी असेही सामंत म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular