26.4 C
Ratnagiri
Wednesday, August 6, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeTechnologyरिलायन्स जिओने जाहीर केले स्पेशल रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओने जाहीर केले स्पेशल रिचार्ज प्लॅन

हे प्लॅन १२९ रुपयांपासून ते ४९९ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

विविध ठिकाणी, विविध मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कला मागणी जास्त असते. त्यामुळे कंपन्या अनेक वेळा वेगवेगळे प्लान्स जाहीर करत असतात. आता ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने नवीन योजना बाजारात उपलब्ध केली आहे. जिओचे अनेक प्लॅन हे खिशाला परवडणारे आहेत. हे प्लॅन १२९ रुपयांपासून ते ४९९ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

रिलायन्स जिओचा हा सर्वात स्वस्त प्लॅन असून त्याला २८ दिवसांच्या वैधता असणार आहे. जिओच्या सुपर व्हॅल्यू असलेला प्लॅनचा हा १२९ रुपयांचा रिचार्ज हा भाग आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ + एकूण २ जीबी डेटा + ३०० एसएमएसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच जिओचे फ्री अ‍ॅप्स सबस्क्रिप्शन देखील देण्यात आले आहेत.

रिलायन्स जिओचा १९९ रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनला २८ दिवसांची वैधता असून, या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा + कोणत्याही नेटवर्कवर अमर्याद मोफत कॉलिंगचा लाभ + दररोज १०० एसएमएसची सुविधा आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिओचे २४९, ३४९, ४९९ चे प्लान देखील जाहीर केले आहेत.

२४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन रिलायन्स जिओने आपला सुपर व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये ठेवला आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा + कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच तुम्हाला जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याच्या सुविधेसह दिले जात आहे.

जिओच्या या ३४९, ४९९ दोन्ही प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा दिला गेला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १०० एसएमएस पाठवू शकता. त्याचबरोबर जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील देण्यात आले आहे. तसेच जिओच्या ४९९ च्या प्लॅनमध्ये दररोज तुम्हाला ३ जीबी + ६ जीबी अतिरिक्त डेटा+ १०० रोज एसएमएस दिले गेले आहेत. डिस्ने आणि हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular