29.3 C
Ratnagiri
Sunday, February 8, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeInternationalयुक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी दिलासाजनक बातमी

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी दिलासाजनक बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा करून हा संहार थांबवण्याची विनंती केली आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असललेल्या युद्धामध्ये अनेक भारतीय विद्यार्थी आणि इतर नोकरदार माणसे सुद्धा अडकली असल्याचे वृत्त समोर आले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा करून हा संहार थांबवण्याची विनंती केली आहे. युद्ध करून काही फायदा नसून, केवळ सामंजस्याने यावर तोडगा निघू शकतो असे पंतप्रधान मोदिनी सांगितले आहे.

त्याचप्रमाणे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी आवश्यक ती मदत पुरवण्यास सांगितले आहे. देशातून सुद्धा अनेक नागरिक तिथे अडकले असल्याने त्यांना सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या साठीच हि मोठी दिलासाजनक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी विशेष विमाने पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारची तयारी सुरू आहे.

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याचा खर्चही भारत सरकार उचलणार आहे. शुक्रवारी विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की,  भारत सरकार युक्रेनमधील भारतीयांसाठी विशेष विमान उड्डाण व्यवस्था सुरु केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा संपूर्ण खर्च भारत सरकार उचलणार आहे. भारत सरकारने युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांना युक्रेनमधून रोमानिया मार्गे बाहेर काढण्यात येणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली.

यानंतर ४७० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुसेवा बॉर्डर क्रॉसिंगद्वारे रोमानियाला पोहोचली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं की, सुसेवा येथील आमची टीम येथील विद्यार्थ्यांना बुखारेस्टला घेऊन जाईल. एका वृत्तसंस्थेनं शुक्रवारी उशिरा हे वृत्त सांगितल आहे. सरकार युक्रेनमधून भारतीयांना रोमानियामार्गे आणणार वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी एअर इंडिया रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे दोन उड्डाणे झाली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular