22.1 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeDapoliदापोली एमआयडीसीतील 'ते' व्यवसाय हटवा - मंत्री उदय सामंत

दापोली एमआयडीसीतील ‘ते’ व्यवसाय हटवा – मंत्री उदय सामंत

दापोली औद्योगिक क्षेत्रात अखंडित वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारण्याची कार्यवाही आठ दिवसात करा. एमआयडीसी क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी भंगार व्यावसायिकांनी अनधिकृत कब्जा केलेल्या जागा तत्काळ मोकळ्या करण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा उद्योगमित्र समितीची सभा झाली. सभेला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा उद्योगकेंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे प्रशांत पटवर्धन यांच्यासह दापोली, खेर्डी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते. पालकमंत्री सामंत यांनी स्वतंत्र विद्युत उपकेंद्राचे काम मार्गी लावण्याबाबत महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला. मंत्री सामंत म्हणाले, महावितरणने वरिष्ठ कार्यालयाकडे मुख्यालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावाबाबत सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे.

रस्त्याची करण्यापूर्वी खोदाई पालिकेकडे परवानगी मागणे, त्याबाबतची पूर्तता करणे ही कामे जबाबदारीने केली पाहिजेत. उद्योजकांनी अखंडित वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्राच्या केलेल्या मागणीचा पाठपुरावा करायला हवा होता. दापोली औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण एमआयडीसीने करावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लोटे परशुराम एमआयडीसीचा बराचसा भाग अधिग्रहण करून देखील त्याचा मोबदला अद्याप दिलेला नाही, तो एमआयडीसीकडे जमा करावा. एमआयडीसी क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी भंगार व्यावसायिकांनी अनधिकृत कब्जा केला आहे त्या जागा मोकळ्या करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठक घेऊन ही अतिक्रमणे दूर करावीत.

निर्यातीसाठी जेट्टींचा वापर करा – एक जिल्हा एक उत्पादनाबाबत आढावा घेऊन पालकमंत्री सामंत म्हणाले, जिल्ह्यातील आंबा उत्पादन, मासे याची निर्यात वाढली पाहिजे. सध्या आंबा, काजूसारखी उत्पादने एपीएमसीमध्ये जातात आणि तेथून पुढे आंबा निर्यात होतो. वास्तविक जिल्ह्यातील निर्यात वाढवण्यासाठी जेएसडब्ल्यूसारख्या जेट्टींचा वापर करण्यासाठी प्रयत्न करावेत. निश्चितच चांगला परिणाम दिसून येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पुढाकार घ्यावा.

खेडर्डीतील फायर स्टेशन सुरू करा – माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत सहायक कामगार आयुक्तांशी चर्चा करावी. लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्र ईएसआयसी कर्मचारी राज्य विमा निगम सेवा उपलब्ध करून देण्याबाबत खासगी रुग्णालयांशी ८ दिवसांत टायअप् करावे. खेर्डी एमआयडीसीमधील फायर स्टेशन सुरू करावे, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular