28 C
Ratnagiri
Friday, June 13, 2025

रत्नदुर्गाच्या बुरूज परिसरात अतिक्रमण…

रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्याचा टेहळणी बुरूज पेठकिल्ला...

शिक्षकांना प्रशिक्षणात अपमानास्पद वागणूक – संभाजी थोरात

राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये प्रथमच...

कृषी विद्यापीठाचा ई-मेल हॅक करून फसवणूक

येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या...
HomeRajapurराजापूरमधील पुराचा धोका दूर करणार - आमदार किरण सामंत

राजापूरमधील पुराचा धोका दूर करणार – आमदार किरण सामंत

अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा यावर्षी करण्यात येत आहे.

राजापूर शहरावरील पुराची टांगती तलवार कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. भविष्यामध्ये गाळ उपशासाठी आवश्यक लागणारा निधी शासनाकडून मंजूर करून आणताना या दोन्ही नद्या गाळमुक्त करत राजापूर शहर पूरमुक्त करण्याचा आपला संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले. गाळ उपशाच्या कामाचा आज आमदार सामंत यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. सातत्याने येणऱ्या पुरामुळे राजापूरवासीयांची डोकेदुखी ठरलेला अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा यावर्षी करण्यात येत आहे. या कामासाठी शासनाच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक सन २०२४-२५ च्या अंतर्गत ६४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

सुमारे ६४ लाखांच्या मंजूर निधीपैकी जवाहर चौक कोदवली नदीपात्र ते पुढे गणेशविसर्जन घाटापर्यंत गाळ उपसा करण्यासाठी २४ लाख ८२ हजार ४६ रुपये, तर अर्जुना नदीपात्रात कोंढेतड पूल ते राजीव गांधी क्रीडांगणापर्यंत गाळ उपसा करण्यासाठी ३८ लाख ७४ हजार ८११ रुपये इतका निधी मंजूर आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने हा गाळ उपसा केला जाणार आहे. याप्रसंगी राजापूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी चेतन विसपुते, जलसंपदा विभागाचे अभियंता रोहित पाटील, मुख्य लिपिक जितेंद्र जाधव आदींसह महायुतीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

आवश्यक निधी आणणार – राजापूर शहरावर दरवर्षी पुराची टांगती तलवार असते. ती दूर करण्यासाठी गाळ उपसा करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा निधी शासनाकडून मंजूर करून आणण्यात येईल. त्याआधारे अर्जुना- कोदवलीतील गाळ उपसा वेळीच केला जाईल, असे किरण सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular