27.9 C
Ratnagiri
Sunday, August 10, 2025

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणवासियांना सुविधा केंद्र – सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

गणेशउत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांसाठी सुविधा केंद्र देण्यात...

सिंधुदुर्गात पुन्हा ‘लम्पी’चा प्रकोप…

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पशुपालकांचे कंबरडे मोडलेल्या 'लम्पी...

समुद्र शांत झाल्याने मच्छीमार आनंदात…

वातावरणाने साथ न दिल्यामुळे मासेमारी बंदी उठूनही...
HomeKokanकोकण हेरिटेज राईड उपक्रम

कोकण हेरिटेज राईड उपक्रम

“कोकण” नाव घेताच डोळ्यासमोरून चितारते ते निसर्गाचं अभूतपूर्व सौंदर्य. अनेक जण ज्यांना विशेषत: निसर्गाच्या सानिध्यात जगायला, वेळ घालवायला आवडते त्यांच्यासाठी कोकण हा सर्वोत्तम पर्याय आहे. कोकणच्या कोणत्याही पट्ट्यामध्ये गेलं तरी निसर्गाचे अनेक विशेष चमत्कार दृष्टीस पडतात. कोकणच्या सौंदर्याचे वर्णन करावे तितके कमीच आहे.

कोकणातील निसर्गसौंदर्य, येथील जनजीवन, वास्तू कला, परंपरा यांची महती विविध राज्यात पोहोचावी म्हणून गुहागरमधील कोकण हेरिटेज राईड हा उपक्रम सिद्धेश खानविलकर आणि प्रविण रणपीसे यांनी आयोजित केला होता. यामध्ये सहभागी झालेल्या पर्यटकांना अडूर बुधल गावातील डोंगरावर असलेले दुर्गादेवी मंदिर, गुहागर मधील १०६ वर्ष जुने कोकणातील घर, विशाल समुद्र किनारा,  व्याडेश्‍वर मंदिर आदी स्थळे दाखविण्यात आली. गुहागरमधील शांताई रिसॉर्टचे संचालक सिद्धेश खानविलकर यांनी नुकतेच कोकण हेरिटेज राईडचे आयोजन केले होते. या उपक्रमांतर्गत त्यांनी विविध राज्यातील ६० विंटेज दुचाकीस्वार, दोन दिवस गुहागरात पर्यटनासाठी आले होते.

या राईडचे वैशिष्ट्य म्हणजे रॅलीत ५० वर्षापूर्वी लोकप्रिय असलेल्या जावा एसडी, बुलेट यांचा समावेश होता. या निमित्ताने गुहागरकरांना विविध प्रकारच्या जावा, एजडीई, जुन्या बुलेट या विंटेज बाईक पाहता आल्या. यामधील सर्वात जुनी गाडी १९६२ साला मधील होती. एक गाडी १९७० मधील होती. अनेक वाहनप्रेमींना या विंटेज गाड्या पहाण्याची संधी मिळाली. या उपक्रमात पुणे आणि मुंबईतील ७ महिला दुचाकीस्वार सहभागी झाल्या होत्या.

कोकणचे सौंदर्य जगाच्या कानाकोपर्यात पोहोचविण्यासाठी हा एक प्रकारचा उत्तम मार्ग असून अनेकांचा या उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद लाभला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular