27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeKokanआंब्यावरील थ्रीप्स रोगावर विद्यापीठात संशोधन

आंब्यावरील थ्रीप्स रोगावर विद्यापीठात संशोधन

झाडांची पाने, मोहर व फळावरही या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो.

हापूस आंब्यावर थ्रीप्स रोगाची लागण झाल्याने त्याचे विपरित परिणाम तालुक्यातील आंबा पिकावर होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यात व्यापक जागृतीची आवश्यकता निर्माण झाली आहे. कोकण कृषी विद्यापीठ या रोगासंदर्भात संशोधन करत आहे. ज्यामुळे भविष्यात या रोगापासून होणार पिकाचे नुकसान टाळता येणे शक्य होणार आहे. तालुक्यात पूर्णपणे आंब्याच्या उत्पन्नावर अवलंबून असणारे शेतकरी व सरासरी चार ते पाच झाडे असणारी शेतकरी असे परस्परविरोधी चित्र आहे. पिकासाठी वर्षभर काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण मात्र तुलनेने कमी आहे. असे असले तरी शेतकऱ्यांच्या अर्थकारणात या नगदी पिकांचा मोठा सहभाग आहे.

अनेक आंबा बागायतदार करार पद्धतीने आपली झाडे व्यापाऱ्यांना विकत असल्याने त्यांनाही या समस्येची झळ सोसावी लागणार आहे. याबाबत कोकण कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. व्ही. एन. जालगांवकर यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात हापूस आंब्यावर थ्रीप्स रोगाची मोठी लागण झाली होती; मात्र उष्णता वाढल्यावर थ्रीप्स या रोगाची कीडीचा प्रार्दुभाव कमी कमी होत जातो. थ्रीप्स म्हणजे फूलकीड व ही अतिशय सूक्ष्म कीड आहे. झाडांची पाने, मोहर व फळावरही या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो.

ही कीड रस शोषून घेत असल्याने फळधारणा होत नाही. ‘फूलकिडीवर उपाययोजना करण्यासाठी शेतकरी स्वतःच्या मनाने दोन ते तीन कीटकनाशके एकत्रित करून फवारणी करतात. त्याचा दुष्परिणाम होतो. यावर कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू आहे. काही गावांमध्ये या विषयासंदर्भात जनजागृती करण्यासाठी शिबिरेही घेतली गेली आहेत. या रोगाचे निवारण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याची शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार आहेत.

जंगली झाडे राखणे गरजेचे – हापूसची लागवड करताना येथील वातावरणातील आजूबाजूची स्थानिक जंगली झाडे राखली जातील, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. जीवनचक्रात निसर्ग स्वतः हा समतोल राखतो. जंगली झाडांवरील कीडे हापूस आंब्यावरील कीटक व लहान कीडे मारून खातात. त्यामुळे नैसर्गिकरीत्या प्रेस्टिसाईजची व्यवस्था निर्माण होते. हापूसवरून कीटके व कीड्याची रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्याने ते कुठल्याही औषधाला दाद देत नाहीत. औषधाचे प्रमाण वाढवले तरीही त्यातूनही ते वाचतात व कृत्रिमपणे केलेल्या फवारणीमुळे जंगली झाडांवरील कीटक आपले रक्षण करू शकत नाहीत. ज्यांच्यासाठी फवारणी केली जाते त्यांच्यावर काहीच फरक पडत नाही. फवारणीमुळे उपयुक्त असलेले मोठे कीटक मात्र मरून जातात.

RELATED ARTICLES

Most Popular