19.8 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriसरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

९४ ग्रामपंचायतींपैकी ४७ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित झाले आहे.

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर काहींच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले तर अनेक इच्छुकांचा हीरमोड झाल्याने त्यांचे पडलेले चेहरेही पहायला मिळाले. रत्नागिरी तालुक्यातील एकूण ९४ ग्रामपंचायतींपैकी ४७ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण सोमवारी जाहीर झाले. रत्नागिरीत ४७ ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार हे निश्चित झाले आहे. तर ३१ जागा सर्वसाधारण म्हणजे खुल्या गटासाठी आरक्षित आहेत. २०२५ ते २०३० या कालावधीसाठी हे आरक्षण असणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोडत निघाली. मार्वी रविंद्र चव्हाण या मुलीने चिठ्ठ्या उचलून आरक्षण निश्चित केली.

त्यामध्ये एकूण ९४ ग्रामपंचायतीपैकी ४७ ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर महिला सरपंच विराजमान होणार आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती स्त्री हे आरक्षण कशेळी आणि वाटद या ग्रामपंचायतीला मिळाले आहे. अनुसुचित जातीसाठी धामणसे, हरचिरी आणि करबुडे या ग्रामपंचायतीवर आरक्षण पडले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री हे आरक्षण गावंडे आंबेरे, पाली, खरवते, रिळ, कापडगाव, हातखंबा, पोमेंडी खुर्द, साखर मोहल्ला, मिऱ्या, कोळंबे, जयगड, खालगाव आणि दांडे आडोम या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांसाठी लागू झाले आहे. तर. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी मेर्वी, कळझोंडी, निवळी, उक्षी, पावस, चाफे, भाट्ये, चरवेली, नाखरे, आगरनरळ, मावळंगे, शिवरगाव, पानवल या ग्रामपंचायती आहेत.

सर्वसाधारण स्त्री राखीव – सर्वसाधारण स्त्री सरपंच पदासाठी काळबादेवी, देऊड, चांदेराई, तरवळ, शिवार आंबेरे, विल्ये, नाचणे नाणीज, बोंडे, टेंभे, टिके, सतकोंडी, वळके वेतोशी, वरवडे, गावखडी, खेडशी, मिरजोळे, खानू, कोतवडे, गडनरळ, म जगाव, लाजुळ, सैतावडे, फणसवळे, नेवरे, डोर्ले, पिरंदवणे, जांभरुण, जांभरी, चवे आणि चाफेरी या ३२ ग्राम पंचायतींसाठी आरक्षण पडले आहे.

सर्वसाधारण गट – सर्वसाधारण गटामध्ये म्हणजे खुल्या खुल्या प्रवर्गासाठी सड्या मिऱ्या, राई, गणपतीपुळे, गुंबद, चांदोर, निवेंडी, करबुडे, नेरूळ, बसणी, साठर, मालगुंड, कुवारबाव, वेळवंड, कासारवेली, तोणदे, सोमेश्वर, केळे, गणेश गुळे, पूर्णगड, कासारी, फणसोप, चिंद्रवली, झरेवाडी, रानपाट, भगवती नगर, ओरी, भोके, गोळप, नांदिवडे, पोमेंडी बुद्रुक आणि कर्ला या ३१ ग्रामपंचायतचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

Most Popular