26.1 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRajapurराजापूरवासीयांना घरबसल्या भरता येणार कर

राजापूरवासीयांना घरबसल्या भरता येणार कर

वर्षभरामध्ये शंभर टक्के करवसुली करण्यावर पालिका प्रशासनाकडून भर दिला जातो.

स्थानिक स्वराज्य संस्था वा नगरपालिकांच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ पद्धतीने सोयी-सुविधा देता याव्यात वा विविध मालमत्ताकरांची वसुली करणे अधिक सोयीचे व्हावे, यादृष्टीने नागरी सेवा पोर्टल (mahaulb.in/MahaULB/ index) अंतर्गत शासनातर्फे ऑनलाईन करप्रणाली विकसित करण्यात आली आहे. या करप्रणालीची राजापूर पालिकेने अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे राजापूरकरांना ऑनलाईन वा डिजिटल पद्धतीने कुठेही बसून घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ताकरांसह अन्य करांच्या रकमेची भरणा करणे शक्य झाले आहे.

नगरपालिकेकडून नागरिकांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्या बदल्यात पालिकेकडून विविध स्वरूपाची कर आकारणी केली जाते. विविध स्वरूपाची दरवर्षी केली जात असलेली ही करआकारणी आणि त्याद्वारे संकलित होणारा महसूल पालिकेच्या उत्पन्नाचा हक्काचा स्त्रोत असतो. शासनाच्या विविध योजनांचा लाभ वा त्यातून विकासकामांसाठी निधी मिळविण्यासाठी शासनाकडे जमा करावी लागणारी लोकवर्गणीची उभारणीही या महसुलाच्या माध्यमातून करणे शक्य होते. त्यामुळे वर्षभरामध्ये शंभर टक्के करवसुली करण्यावर पालिका प्रशासनाकडून भर दिला जातो.

कर मागणीपत्र देणे, करांची वसुली करणे, थकबाकीपोटी मिळकती जप्त करणे, नळजोडण्या तोडणे आदी कारवाया पालिका करत वसुली विभाग करांचा भरणा करून पालिकेची हक्काची तिजोरी अधिक सक्षम करतो. या प्रक्रियेमध्ये अधिक गतिमानता येण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेताना शासनाच्या नगर विकास निभागातर्फे नागरी सेवा पोर्टलवर तयार करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शासनातर्फे तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन करप्रणालीची राजापूर पालिकेतर्फे अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांना आता प्रत्यक्ष पालिकेमध्ये न येता घरपट्टी, पाणीपट्टीसह अन्य विविध स्वरूपाच्या करांची भरणा ऑनलाईन पद्धतीने सहज करता येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular