29.9 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

भाजप ठरवणार निकाल की ‘निक्काल’, चाकरमानीही ठरणार प्रभावी

विधानसभेसाठी जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत झालेले मतदान हे...

दापोलीत उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

दापोली विधानसभा मतदारसंघात ६० टक्के मतदान झाले...

मिरकरवाडा जेटीवर मतदानामुळे शुकशुकाट – मच्छीमारांची सुटी

शहरात तसेच नजीकच्या परिसरात लोकशाही महोत्सवात मतदान...
HomeRatnagiriकोत्रेवाडीतील रहिवासी मतदानावर बहिष्कार टाकणारच ! डम्पिंग ग्राउंड प्रश्न

कोत्रेवाडीतील रहिवासी मतदानावर बहिष्कार टाकणारच ! डम्पिंग ग्राउंड प्रश्न

प्रकल्प या ठिकाणी जोर जबरदस्तीने राबविला जात असल्याचा रहिवाशांचा दावा आहे.

डम्पिंग ग्राउंड प्रकल्पासंदर्भात प्रशासनाकडून अपेक्षित उत्तर मिळेल अशी अपेक्षा असताना तुम्ही मतदानावर बहिष्कार न टाकता मतदान करा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी केले. मात्र डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावरूनच आम्ही म तदानावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे याच प्रश्ना संदर्भात जर अपेक्षित उत्तर प्रशासनाकडून मिळत नसेल तर विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी कायम ठेवला आहे. हा बहिष्कार कोणाच्याही सांगण्यावरून टाकलेला नसून प्रत्येक नागरिकाने उस्फर्तपणे व स्वयंप्रेरणे हा निर्णय घेतला असल्याचे सर्व कोत्रेवाडी नागरिकांकडून सांगण्यात आले. लांजा नगरपंचायतीच्यावतीने कोत्रेवाडी येथे कोणत्याही निकषात न बसणारा डंपिंग ग्राउंड प्रकल्प या ठिकाणी जोर जबरदस्तीने राबविला जात असल्याचा रहिवाशांचा दावा आहे. या विरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून गेल्या चार वर्षांपासून या विरोधात मोर्चा, आंदोलन व उपोषणे या मार्गाने आपला विरोध दर्शविलेला आहे.

याच अनुषंगाने आजपर्यंत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून या डम्पिंग ग्राउंड प्रकल्पासंदर्भात ग्रामस्थांना सातत्याने सापत्नपणाची वागणूक दिल्याचा आक्षेप घेत अखेर कोत्रेवाडी नागरिकांनी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीतील मतदानावर देखील नागरिकांनी बहिष्कार टाकला आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी राजापूर विधानसभा डॉ. जॅसमिन यांनी शनिवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता लांजा तहसील कार्यालयात कोत्रेवाडी नागरिकांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे देखील उपस्थित होते.

सुरुवातीला कोत्रेवाडी नागरिकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. वाडीवस्तीलगत जोर जबरदस्तीने निकषात न बसणारा डंपिंग प्रकल्प राबवला जात असल्याने आम्ही नागरिक उध्वस्त होणार आहोत. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी मागणी ग्राम स्थांनी केली. मात्र डम्पिंग ग्राउंड आणि निवडणुकीवर, मतदानावर बहिष्कार या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे नगरिकांनी मतदानावर बहिष्कार नटाकता मतदान करा. तुम्हाला एखादा किंवा सर्वच लोकप्रतिनिधी योग्य वाटत नसतील तर तुम्हाला नोटाचा देखील पर्याय दिलेला आहे. त्या पर्यायाचा वापर करा. परंतु तुम्ही मतदानाचा आपला हक्क बजावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन यांनी केले. मात्र आमचा विरोध हा कोणत्याही उमेदवाराला नाही तर डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाला विरोध आहे. हा प्रकल्प जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत कोत्रेवाडी नागरिक उस्फूर्तपणे या विरोधात लढा देणार असून त्याचाच एक भाग म्हणून या मतदानावर बहिष्कार टाकला असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन यांनी कोणाही नागरिक मतदान करू नये यासाठी जबरदस्ती वा दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका अशा सूचना केल्या. म ात्र नागरिकांवर दबाव टाकण्याचा प्रश्नच नाही. सर्व नागरिकांनी डम्पिंग ग्राउंडला असलेल्या विरोधातून उस्फूर्तपणे हा निर्णय घेतला आहे. प्रत्येक नागरिकांचा हा स्वतःचा निर्णय असल्याचे सर्वांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी आमच्यावर हा प्रकल्प लादला असून आमच्या मागणीची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. म्हणूनच डम्पिंग ग्राउंड प्रकल्प कोत्रेवाडी येथून रद्द होणे हीच आमची मागणी आहे. त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागणी संदर्भात प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून आम्हाला अपेक्षित उत्तर मिळत नाही तोपर्यंत आमचा निवडणुकीवर बहिष्कार ठाम राहील असे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीला कोत्रेवाडीतील ग्रामस्थ मंगेश आंबेकर, संतोष कोत्रे, दीपक आडविलकर, राजाराम कोत्रे, महेश साळवी, श्रीधर साळवी, श्रीकांत साळवी, संजय कोत्रे, राजेश सुर्वे, मयुरेश आंबेकर, संदीप खामकर, शरद शिंदे, जयराम साळवी, रामनाथ साळवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular