25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraशासकीय कार्यालयासाठी मोबाईल वापराची नियमावली जाहीर

शासकीय कार्यालयासाठी मोबाईल वापराची नियमावली जाहीर

शासकीय काम आणि सहा महिने थांब. असं काहीसं प्रत्येक शासकीय कार्यालयाबद्दल ऐकायला येत असते. बरेचसे कर्मचारी आपले काम अगदी प्रामाणिकपणे करत असतात. पण काही मात्र, काही वेळेस लोक कामासाठी खोळंबलेली असताना, कर्मचारी मात्र फोनवर बोलत बसलेले दिसतात. पण अशा काही कर्मचाऱ्यांमुळे अनेक शासकीय कार्यालयांची नावे मलिन झाली आहेत.

मध्यंतरी शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडबाबत शासनाने नवीन नियमावली जाहीर केली होती, त्यानंतर आत्ता शासनाने, कर्मचाऱ्यांचा मोबाईल वापराबाबत नियमावली जाहीर केली आहे. कार्यलयीन वेळेत मोबाईलचा वापर कसा करायचा या संदर्भात राज्य सरकारने परिपत्रक काढून सक्तीचे नियम जारी केले आहेत. शासकीय कार्यालयात मोबाईल वापरताना तसेच त्यामध्ये अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात कर्मचारी दिरंगाई करत असून, अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची एक वाईट प्रतिमा जनतेसमोर उभी राहात आहे, असे  सांगत परिपत्रक काढण्यात आलं आहे.

जाणून घेऊया नक्की काय आहेत शासकीय कार्यालयात मोबाईल वापरण्या बाबतीतील नियम.

  1. कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामासाठी कार्यालयात असलेल्या लँडलाईनचा वापर करावा.
  2. मोबाईल वर संभाषण करताना, आजूबाजूला इतर लोक आहेत याचे भान ठेवून बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा.
  3. मोबाईल वरती बोलताना संविधानिक भाषेचा वापर करण्यात यावा.
  4. मोबाईल वर बोलत असताना एखाद्या लोकप्रतिनिधी अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फोन आल्यास, त्यांना वेटिंग वर न ठेवता, तात्काळ प्रतिसाद द्यावा.
  5. जर एखाद्या वेळेस वैयक्तिक आणि अत्यावश्यक  फोन असेल तर ते शक्यतो कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत.
  6. कार्यालयीन अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या बैठकीमध्ये मोबाईल फोन सायलंट मोड वर असावा, जेणेकरून बैठकीमध्ये व्यत्यय येणार नाही.
  7. कोणत्याही कार्यालयीन कामासाठी दौऱ्यावर गेले असता, मोबाईल बंद ठेवता कामा नये.

अशाप्रकारची नवीन नियमावली शासकीय कर्मचार्यांसाठी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कामावर जास्त लक्ष केंद्रित होऊन, अनेक वेळ खाऊ कर्मचाऱ्यांना लगाम बसायला मदत होईल.

RELATED ARTICLES

Most Popular