30 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...

‘या’ तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितली

विधानसभा निडवणुकीच्या मतदानानंतर बुधवारी समोर आलेल्या एक्झिट...
HomeKokanपरतीच्या पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

परतीच्या पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

परतीचा पाऊस राज्यात धुमाकूळ घालण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. दोन दिवसांत मोसमी वारे वायव्य भारतातून आपला परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. मॉन्सून परतीच्या काळात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने परतीचा पाऊस राज्यात धुमाकूळ घालण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नवरात्रोत्सवात बरसणार – मॉन्सूनचा परतीचा प्रवास यंदाही लांबला असून, देशाच्या प्रमुख भागांमधून मॉन्सूनची माघार उशिरा होण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर- पश्चिम भारतात थोडी कमी पावसाची स्थिती असल्याने पश्चिम राजस्थान आणि कच्छ भागातून दक्षिण-पश्चिम मॉन्सूनची माघार २३ सप्टेंबरपर्यंत सुरू होऊ शकते. मात्र, हवामान विभागाच्या विस्तारित श्रेणीतील अंदाजानुसार २३ सप्टेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या प्रणालीच्या निर्माणामुळे मध्य भारत (मध्य प्रदेश, छत्तीसगड) आणि महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

कमी दाब प्रणालीच्या संभाव्य हालचालींमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात (२७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर) मध्य भारत आणि महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढू शकते. पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने प्रणालीच्या हालचालींमुळे पावसाचा जोर अधिक असू शकेल. चौथ्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तयारी ठेवावी आणि त्यानुसार नियोजन करावे, असेही डॉ. कश्यपी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular