24.9 C
Ratnagiri
Saturday, October 25, 2025

कळंबस्ते येथे खड्ड्यात फटाके वाजवून दिवाळी…

चिपळूण तालुक्यातील रस्ते विकासासाठी आणलेला निधी पावसाच्या...

रत्नागिरीत शिवसेना युतीसाठी आग्रही; भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा नकार

रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच महायुतीच्या...

डंपिंग ग्राऊंडचे होणार निसर्गोद्यान गुहागरमध्ये साकारला पहिला प्रकल्प

कोकण पर्यावरणाच्यादृष्टीने अधिक सुरक्षित व सुजलाम सुफलाम...
HomeRatnagiriपरतीच्या पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान…

परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान…

नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे आर्थिक नुकसान होऊनही पंचनाम्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

यंदा दिवाळीचा उत्साह असतानाच, परतीच्या पावसाने सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजेरी लावली आहे. दिवाळी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज अशा महत्त्वाच्या सणांच्या काळात असल्याने सणासुदीच्या वातावरणावर विरजण पडले आहे. विशेषतः संध्याकाळच्या वेळी पाऊस कोसळत असल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत होणारी ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत रोडावली आहे.

बाजारपेठेतील गर्दीवर परिणाम – भाऊबीजेच्या निमित्ताने सकाळीच काही ग्राहक बाजारात आले असले तरी, पावसाचा शिडकावा झाला. दिवसभर आकाश ढगाळ असल्याने ग्राहकांनी गर्दी टाळण्यासाठी संध्याकाळऐवजी दुपारच्या वेळेत खरेदीसाठी वेळ निवडली. सणांच्या काळात अपेक्षित असलेली उलाढाल या पावसामुळे मंदावली आहे. परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेती आणि बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः भात पीक सध्या कापणीच्या अवस्थेत आहे. शेतकरी मोठ्या कष्टाने भात पीक कापणी करत असतानाच, या पावसाने भात भिजत आहे. काही ठिकाणी तयार भात पीक जमिनीवर आडवे झाले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरमसाट आहे.

कृषी विभाग व लोकप्रतिनिधींची उदासीनता; नुकसान भरपाईची चिंता – प्रशासनाकडून अतिवृष्टीमुळे शेती व बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाही, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी विभाग आणि लोकप्रतिनिधींनी नुकसान भरपाई देण्याबाबत पंचनामे करण्याचे टाळले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे आर्थिक नुकसान होऊनही पंचनाम्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कृषी विभाग आणि लोकप्रतिनिधींनी तत्काळ पंचनामे करून मदतीचा हात पुढे न केल्यास, शेतकरी हवालदिल होण्याची भीती आहे.

RELATED ARTICLES

Most Popular