29.9 C
Ratnagiri
Wednesday, March 12, 2025

छत्रपती संभाजीराजेंचे भव्य स्मारक व्हावे – प्रमोद जठार

संभाजी महाराजांनी ११ मार्च १६८९ मध्ये बलिदान...

दापोलीमधील वाहतुकीची गती मंदावली…

येथील एसटी बसस्थानक ते बुरोंडीनाका या परिसरातील...

‘बसरा स्टार’साठी बंधारा कमी करणार

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर...
HomeRatnagiriदेवरहाटीच्या जमिनी परत करा ! रत्नागिरीमध्ये घंटानाद आंदोलन

देवरहाटीच्या जमिनी परत करा ! रत्नागिरीमध्ये घंटानाद आंदोलन

शासनाने हिंदूंच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांचे उल्लंघन केले आहे.

देवरहाटीच्या जमिनी शासनाने हस्तगत केल्या आहेत. त्या तत्काळ देवस्थानच्या नावे कराव्यात, या मागणीसाठी सोमवारी रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कचेरीसमोर जयस्तंभ परिसरात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर आपल्या मागणीचे निवेदन महासंघाने शासन दरबारी सादर केले आहे. देवरहाटी / देवराई हा ग्रामस्थांच्या श्रद्धेचा आणि धार्मिक परंपरेचा विषय आहे, असे असूनही महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधील प्रावधानाचा भंग करून, तसेच मंदिरे धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर नसल्याचे कारण देत बेकायदेशीरपणे देवस्थानचे नाव कमी केले आणि ‘महाराष्ट्र शासन’ अशी नोंद केली. याद्वारे शासनाने हिंदूंच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांचे उल्लंघन केले आहे. याच्या निषेधार्थ तालुक्यातील जयस्तंभयेथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने चालू अधिवेशनात ‘देवरहाटीच्या जमिनीवरील शासनाचा हक्क कमी करून त्या पुन्हा देवस्थानाच्या नावे करण्याचा निर्णय घ्यावा’, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात अधिक तीव्र करण्याची चेतावणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने शासन आणि प्रशासनाला दिली आहे. या आंदोलनाला मंदिर विश्वस्तांचा चांगला प्रतिसाद होता. आंदोलनानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना देण्यात आले. यावेळी संगमेश्वर येथील श्रीदेव निळकंठेश्वर देवस्थानचे अध्यक्ष जयंत आठल्ये, सचिव चैतन्य सरदेशपांडे, लांजा येथील श्री जुगाई पौलस्तेश्वर मंदिराचे विश्वस्त मुकुंद गांधी, संतोष लिंगायत, कारवली येथील श्री काळंबा देवीचे अरविंद वरेकर, शिवचरित्र कथाकार अरविंद बारस्कर, नेवरे येथील श्रीदेव विश्वेश्वरचे अध्यक्ष मुकुंद परांजपे, पाली येथील हिंदुत्वनिष्ठ प.वि. सावंत, मुरुगवाडा येथील श्री भैरी देवस्थानचे विश्वस्त विजय पिळणकर, राजापूर येथील धोपेश्वर देवस्थानचे प्रकाश कांबळे, गोठणे दोनिवडेचे सुधीर विचारे, शीळ येथील गोपाळ गोंडाळ, न्यू हनुमान मंदिर, खडपेवाडी-राजापूरचे अध्यक्ष मनिष शिंदे, आंबेवाडी ग्रामस्थ विकास मंडळ राजापूरचे अध्यक्ष प्रकाश लोळगे, श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर राजापूरचे विजय हिवाळकर, वाटद-खंडाळा येथील सौ. प्राजक्ता जंगम यांच्यासह १०० हून अधिक विश्वस्त, हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular