26.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeChiplunचिपळूणात सर्पदंशाने बेशुद्ध झालेला चिमुकला २० दिवसांनी शुद्धीवर..

चिपळूणात सर्पदंशाने बेशुद्ध झालेला चिमुकला २० दिवसांनी शुद्धीवर..

देव तरी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्येय हळूहळू येऊ लागला.

‘देव तरी त्याला कोण मारी’, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. चिपळूणात सर्पदंशाने बेशुद्ध झालेल्या ९ महिन्यांच्या चिमुकल्यावर डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात उपचार सुरु होते. तब्बल २० दिवसानी तो शुद्धीवर आला. घणसोली, नवी मुंबई येथे राहणाऱ्या चिन्मय जाधव या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला त्याच्या पालकांनी गणपती उत्सवासाठी दुर्गवाडी येथे आणले होते. मात्र, ता. ७ सप्टेंबर २०२४ रोजी मुलाच्या गळ्याला मण्यार या अत्यंत विषारी सापाने मानेचा चावा घेतला. त्यामुळे ते बाळ पूर्णपणे बेशुद्ध झाले. श्वासही व थांबला, आणि त्यांचा हातपायामधील ताकद पूर्णपणे गेली. बाळाला तातडीने भ. क. ल. वालावलकर, रुग्णालयात आणण्यात आले.

बालरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब उपचार सुरु केले. कुत्रिम श्वास देण्याकरता व्हेंटिलेटर लावण्यात आला. पनवेल हुन खास मार्गदर्शन करणारे डॉ. महेश मोहिते आणि वालावलकर रुग्णालयाचे डॉ. अनिल कुरणे, डॉ. शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले. अनेक दिवस बाळ निपचित होते. शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती जिवंतपणाचे लक्षण म्हणजे डोळ्याच्या बाहुल्याची हालचाल ती सुद्धा होत नव्हती. असे अनेक दिवसांपासून मुलाची प्रकृती गंभीर होत होती. भारत सीरमंच्या अँटी स्नेक व्हेनमच्या एकूण ३० कुप्या देण्यात आल्या होत्या. तरीही सुधारणा दिसेना. शेवटी डॉक्टर्सनी सुद्धा आशा सोडली होती.

पण देव तरी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्येय हळूहळू येऊ लागला. दहाव्या दिवशी बाळाने डोळे उघडले. हळूहळू उपचारांना प्रतिसाद देत हात हलवू लागले आणि आपल्या आईला सुद्धा ओळखू लागले. जवळजवळ पाऊण महिना हे बाळ मृत्यू शय्येवर होते. २० दिवसांनंतर पूर्णपणे हे बाळ शुद्धीत आले. पण बाळाला व्हेंटिलेटर असताना इन्फेक्शन होऊ, नये पाठीला जखमा होऊ नयेत याची पूर्ण जबाबदारी बालरोग तज्ज्ञांनी समर्थपणे पेलली.. बाळाचा संपूर्ण खर्च हा महात्मा जोतिबा फुले योजने अंतर्गत पूर्णतः मोफत करण्यात आला.

रुग्णालयातील बालरोल विभागातील नर्सिंग स्टाफ आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. गौरी परब, डॉ. प्रचेता गुप्ता, डॉ. मोहित कडू, डॉ. सलोनी शाह, डॉ. पंक्ती मेहता, डॉ. तनीषा सोमकुवर यांनी विशेष सेवा देऊन बाळाचा जीव जीव वाचवला. याबद्दल डेरवण रुग्णालय प्रशासनाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular