24.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriवाढत्या महागाईची जिल्हा कॉंग्रेसतर्फे प्रतीकात्मक प्रेतयात्रा

वाढत्या महागाईची जिल्हा कॉंग्रेसतर्फे प्रतीकात्मक प्रेतयात्रा

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत असून, आर्थिक घडी विस्कटली असून, त्यांचा ताळमेळ बसणे कठीण बनले आहे.

दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई लक्षात घेता, सर्वच गोष्टीचे बजेट कोलमडू लागले आहे. घरगुती खर्चाची कसरत करता करता गृहिणी वर्गाचे तारेवरची कसरत सुरु आहे. त्यामुळे या महागाई विरोधात सरकाराचा निषेध करण्यासठी रत्नागिरीतील जिल्हा कॉंग्रेसतर्फे महागाईची प्रेतयात्रा काढण्यात आली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत असून, आर्थिक घडी विस्कटली असून, त्यांचा ताळमेळ बसणे कठीण बनले आहे.

वाढत्या महागाईला केंद्र सरकारला जबाबदार धरत मंगळवारी जिल्हा काँग्रेसतर्फे रत्नागिरीतील काँग्रेस भवन येथे ‘ महागाई जुमला आंदोलन’ करण्यात आले.यावेळी गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. तसेच दुचाकी रस्त्यावर आडवी ठेवून हार घालण्यात आला. इंधनाच्या वाढीमुळे जनता मेटाकुटीस आली आहे.

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसने आज रस्त्यावर उतरत आंदोलन केले. महाराष्ट्र प्रदेशच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे केंद्रातून झालेली हि दरवाढ कधी कमी होणार आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष विकास पाटील, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, प्रदेश महिला सरचिटणीस रूपाली सावंत, उपतालुकाध्यक्ष सुस्मिता सुर्वे, जिल्हा सरचिटणीस बंटी गोताड, युवकचे चेतन नवरांगे, तालुका सचिव काका तोडणकर, जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. अश्विनी आगाशे, मीडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, महिला तालुकाध्यक्ष रिझवना शेख, प्रवीण आग्रे, महेश कुबल, केतन पिलणकर, जयवंत करमरकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन मालवणकर, जयसिंग राऊत, मनोहर आयरे, मोहन गोपाळ चव्हाण, असिफ अहमद बुड्ये उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular