28.2 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeEntertainment'घरी जाऊ दे, आई वाट पाहत असेल' रितेशची जीम ट्रेनरला हात जोडून...

‘घरी जाऊ दे, आई वाट पाहत असेल’ रितेशची जीम ट्रेनरला हात जोडून विनंती

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा जीम ट्रेनर त्याला  सज्जड दम भरतानाचा व्हिडियो सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडमधील अभिनेता रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची जोडी कायमच चर्चेत असते. हिंदी सिने सृष्टीतील क्युट कपल म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. सोशल मिडीयावर ते कायमच सक्रीय असतात. अनेक सणांचे सादरीकरण ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणवर आहे.

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा जीम ट्रेनर त्याला  सज्जड दम भरतानाचा व्हिडियो सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला आहे. अलिकडेच रितेशने इन्स्टावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला असून त्याचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीत उतरत आहे. अनेकदा इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ किंवा  फोटो शेअर करुन तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.

रितेशने नुकताच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो जीम मध्ये व्यायाम करत असून त्याचा जीम ट्रेनर त्याच्या कडून जबरदस्तीने हेवी वर्कआऊट करुन घेत आहे. त्यामुळे कंटाळलेल्या रितेश जीम ट्रेनरला हाथ जोडून विनवण्या करतो कि, आता तरी घरी जाऊ दे. मात्र, जो पर्यंत योग्य पद्धतीने वर्क आऊट पुर्ण  झाल्याशिवाय घरी जाता येणार नाही,  असा सज्जड दम या जीम ट्रेनरने रितेशला दिला आहे. विशेष म्हणजे त्याचे सादरीकरण अतिशय मजेशीर अंदाजामध्ये केलेले आहे आणि या व्हिडीयोने सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत बाझी मारली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रितेश लेग मशीन वर्कआऊट करत असतो, पण कंटाळालेल्या अवस्थेत तो मिश्कील अंदाजामध्ये हात जोडत ‘घरी जाऊ दे आई वाट पाहत असेल’,अशी विनवणी जीम ट्रेनरला करताना दिसत आहे. रितेश सोशल मीडियावर असे काही भन्नाट व्हिडीओ अपलोड करून चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. यात काही वेळा तो त्याच्या कुटुंबासोबतचे व्हिडीओही अपलोड करत असतो.

RELATED ARTICLES

Most Popular