26.3 C
Ratnagiri
Thursday, August 7, 2025

गणेशोत्सव कालावधीत रेल्वेप्रवासात मिळणार आता उकडीचे मोदक

गणरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वंदे भारत आणि...

पुनर्वसन वसाहत की, कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड

मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुनर्वसन वसाहत...

महाविकास आघाडीचा महावितरण अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

दिवसात अनेकवेळा लाईट जात आहे.... तरीपण अवाच्यासवा...
HomeEntertainmentरितेश आणि जेनिलियाचे नवीन विश्वात पदार्पण

रितेश आणि जेनिलियाचे नवीन विश्वात पदार्पण

हिंदी सिने सृष्टीतील प्रसिद्ध जोडी रितेश आणि जेनिलिया सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सोशल मिडीयावर तर ते कायमच सक्रीय असून, प्रेक्षकांची मन जिंकत असतात. त्यामुळे या दोघांची नवीन काही बातमी कळते का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून असते.

जेनिलियाच्या कमबॅकची आणि नवीन चित्रपटाच्या घोषणेमुळेच पुन्हा या दोघांची चर्चा सुरु झाली आहे. ‘वेड’ या मराठी चित्रपटातून रितेश दिग्दर्शनात पदार्पण करणार असून, त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया या चित्रपटाची नायिका असणार आहे. मोठ्या ब्रेकनंतर जिनिलिया मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. मोठ्या पडद्यावर या जोडीला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद कायम मिळतो. यापूर्वीही दोघे अनेक चित्रपटात एकत्र दिसले आहेत. आता त्यांच्या चित्रपटांच्या यादीमध्ये अजून एक चित्रपट जोडला गेला आहे.

रितेशने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या नवीन मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले की,  ’२० वर्षे कॅमेऱ्यासमोर उभे राहिल्यानंतर, प्रथमच मी आता त्याच्या मागे उभे राहण्यास तयार झालो आहे.  मी माझा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करत असल्यामुळे,  मी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मागतो आहे. या प्रवासाचा एक भाग व्हा,  आमच्या या वेडाचा भाग व्हा.’

या चित्रपटामध्ये दिग्दर्शनासोबतच रितेश अभिनयाचीही कमान सांभाळणार आहे. रितेशने स्वतः सांगितले आहे की, ‘वेड’ म्हणजे वेडेपणा. यासोबतच त्याने चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. या पोस्टरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट मुंबई फिल्म कंपनी सादर करणार आहे. रितेश आणि जेनिलियाला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक अतिशय उत्सुक आहेत.

रितेश जेनिलियाच्या नव्या चित्रपटाचे संगीत अजय-अतुलने दिले आहे. हा चित्रपट १२ ऑगस्ट २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता रितेश आणि जेनेलियाची जोडी काय कमाल उडवते याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular