27.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

‘एमआयडीसी हद्दपार’चे झळकले फलक, वाटदवासीयांचे गणरायाला साकडे

एमआयडीसी हद्दपार करा, असे फलक वाटद पंचक्रोशीतील...

व्यापाऱ्यांवर गणेश प्रसन्न, २० कोटींची उलाढाल…

ऑनलाइन खरेदीचा कल वाढत असतानाही गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी,...

गणेशोत्सवासाठी गावी आलेला तरूण पुराच्या पाण्यात बेपत्ता

गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेला एक तरूण वहाळाला...
HomeKhedसावधान ! कशेडी घाटात रस्ता खचतोय

सावधान ! कशेडी घाटात रस्ता खचतोय

वाहन चालकाची चूक झाल्यास वाहन थेट दरीत कोसळण्याची शक्यता आहे.

कशेडी घाटात भोगावच्या हद्दीत दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्ता खचू लागला आहे. २५ जुलै २००५ पासून याच ठिकाणी रस्ता खचत असून यावर काममस्वरुपी उपाय करण्यास बांधकाम विभागाला आपयश आलेले आहे. ही जागा डेंजर झोन बनली असून वाहन चालकाची चूक झाल्यास वाहन थेट दरीत कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करत आहेत. गेल्या आठ दिवसापूर्वी हायड्रोजन गॅस वाहतूक करणारा ट्रक थेट दरीत कोसळून दुर्घटना झाल्याची ताजी घटना घडली आहे. महामार्ग प्रशासनाने या ठिकाणी कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणी वाहन चालक आणि प्रवासी जनतेतून केली जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात पोलादपूरपासून ९ किलो मीटर अंतरावर दरवर्षी रस्ता खचत असतो. यंदाही रस्ता खचला आहे. रस्ता रत्नागिरीच्या दक्षिण बाजूने आणि मुंबईच्या उत्तर बाजूनेमध्य दोन फूट खचला आहे. पावसाळी मोसम ात येथे रस्ता खचण्याची प्रक्रिया सुरू होते आणि अंदाजे १०० मीटर अंतरात साडेतीन फूट खोलवर खचतो. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ‘जनतेकडून होत आहे. या रस्त्याचे हे अवघड दुखणे २५ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर सुरू झाले आहे.

यावर २१ वर्षांत बांधकाम विभागाला औषध सापडले नाही, खरे. दि. २५ जुलै २००५ रोजी या ठिकाणी माथ्यापासून रस्त्यावर डोंगराचा भाग अलग होत प्रचंड आकाराच्या दगड धोंड्यांसह खाली घसरत आला होता. या महाकाय दरडीमुळे रस्त्यावरच २५ फुटापर्यंत डोंगर निर्माण झाला होता. जेसीबी, पोकलेन च्या साह्याने रात्रंदिवस काम केले तरीही दरड हटवायला १५ दिवस लागले होते. त्या दिवसांपासून या ठिकाणी दर पावसाळ्यात रस्ता खेचत आहे. वेळोवेळी महामार्ग बांधकाम विभागाकडून दुरुस्ती करण्यात येत असली तरी कायमस्वरुपी दुरुस्त होत नाही.

या रस्त्यावरून ट्रेलर, टेम्पो, ट्रक अशा ४० टनांपेक्षा जास्त क्षमतेच्या आहे माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाची वर्दळ असते. त्यामुळे पावसाळ्यात येथील अंदाजे १०० मीटरचा रस्ता खड्ड्यांचा बनतो. आताही रस्त्यात खड्डे आहेत तसाच तो खचलादेखील आहे. त्यामुळे येथे अवजड वाहने एकतर बंद पडतात किवा मध्यभागात आल्यावर चढ चढताना मागे सरकून दरीत कोसळतात. या सर्वांमुळे हा धोकादायक स्पॉट बनला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular