रत्नागिरीतील रस्त्यांची असलेली दुर्दैवी अवस्था पाहून, अनेक मार्गाने त्याची डागडुजी करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. परंतु पुन्हा अपुर्या निधी अभावी रस्त्यांच्या कामाचा वेग मंदावला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेने रत्नागिरी तालुक्यातील रस्ते दुरूस्तीसाठी तीस कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. मात्र शासनाने त्यापैकी फक्त १ कोटी ९ लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे हा निधी ९ तालुक्यात कसा वर्ग करायचा, असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनापुढे उभा राहिला आहे.
यंदाच्या वर्षी आलेल्या वादळ आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची वाताहत झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले असून, रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. अशा खड्डेमय रस्त्यांनी वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक रित्या नुकसान झाले आहे.
खड्ड्यातून मार्ग काढताना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, अशा खड्ड्यांचे साम्राज्य असलेल्या रस्त्यावरून वाहनचालकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामध्ये साधारण शहर आणि जवळपासचे सर्वच रस्ते खराब झाले असून, त्यासाठी जि.प.प्रशासनाने ३० कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली होती. मात्र फक्त १ कोटी ९ लाख रुपये खड्डे भरण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेकडे मंजूर केले असून दिले आहेत.
मिळालेला निधी हा केवळ, रत्नागिरी तालुक्यासाठी मर्यादित नसून, या निधीमध्ये ९ तालुक्यांमध्ये वर्ग करावा लागणार असून, एवढ्या कमी प्रमाणातील निधीमध्ये रस्त्यांची कामे कशी पूर्ण होणार! असा प्रश्न जिल्हा परिषदेला पडला आहे.