24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeSportsरोहितच्या चाहत्याचा भर मैदानात पराक्रम, व्हिडियो व्हायरल

रोहितच्या चाहत्याचा भर मैदानात पराक्रम, व्हिडियो व्हायरल

भारत आणि क्रिकेट याचं वेडचं काही और आहे. विविध खेळाडूंचे विविध चाहते असतात. अनेक चाहते खेळाडूंच्या एका प्रत्यक्ष झलक साठी जीवाचे रान करताना दिसतात. सध्या सुरू असलेल्या टी-२० सामन्यांमध्ये सुद्धा रोहित शर्मा याला त्याच्या चाहत्याचा असा अनुभव आला आहे.

भारतीय क्रिकेटपटूंबाबत चाहत्यांना असलेली क्रेझ कोणापासूनही लपलेली नाही. आपल्या स्टार खेळाडूची एकदा भेट होण्यासाठी चाहते काय करतील, हे सांगणेही कठीण. रांची येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या सामन्यात रोहितच्या एका चाहत्याने असे काही केले, कि, त्यानंतर तो व्हिडियो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी-२० सामना रांचीत खेळला गेला. यावेळी सर्व सुरक्षा व्यवस्था झुगारून भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या एका चाहत्याने भर मैदानामध्ये उडी मारली आणि धावतच रोहितपर्यंत पोहोचला. या चाहत्याला पकडण्यासाठी सुरक्षा कर्मचारीही धावले. पण तो त्यांना चुकवून सुद्धा रोहितच्या दिशेने पुढे धावत गेला. त्या चाहत्याला रोहितच्या पायांना स्पर्श करायचा होता, पण रोहितने क्रिकेट बोर्डाच्या नियमाचे पालन करत त्याला त्याच्या जवळ येऊ दिले नाही.

तरी सुद्धा मागे न हटता,  रोहित शर्माने नकार दिल्यानंतर देखील त्या चाहत्याने जमिनीवर लोटांगण घालून त्याला लांबूनच नमस्कार केला. याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणातच व्हायरल झाला आहे. ज्या पॅव्हेलियनमधून चाहत्याने मैदानात प्रवेश केला, ते व्हीव्हीआयपींसाठी राखीव असते, त्यामुळे तिथे इतर कोणालाही त्या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. सोशल मिडिया हे एक असे माध्यम आहे जिथे खर्या खोट्या सर्व बातम्या काही क्षणातच व्हायरल झालेल्या दिसतात. हि जरी बातमी खरी असली तरी सोशल मिडीयावरील बातम्यांची प्रथम खातरजमा करून घेणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular