रत्नागिरीतील झर्ये गावातील एक १९ वर्षीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न सचिन तेंडूलकर फाउंडेशन पूर्ण करणार आहे. ग्रामीण भागात राहून, उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून, झर्ये गावातील दीप्ती विश्वासराव ही मुलगी लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक किलोमीटर ऑनलाइन क्लाससाठी नेटवर्क शोधत पायपीट करत असे.
नेटवर्कच्या अडचणीमुळे तिच्या ऑनलाइन क्लासमध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत असे. त्यामुळे अभ्यासावर परिणाम होऊ लागला. त्यामुळे जिथे व्यवस्थित नेटवर्क मिळेल अशा ठिकाणी राहायचे ठरविले, पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, बाहेर जाऊन राहणे तिच्या कुटुंबाला शक्य नव्हते. अकोला येथील शासकीय कॉलेजमध्ये तिने ऍडमिशन घेतले, त्यासाठी दिप्तीच्या कॉलेजची फी भरण्यासाठी नातेवाईक आणि शेजाऱ्यांकडून पैसे उधार घेऊन त्यांनी फी भरली, पण इतर हॉस्टेलचा नी इतर खर्च त्यांच्या परिस्थितीच्या आवाक्याबाहेर आहे. त्यावेळी सचिन तेंडुलकर फाउंडेशनने तिला मदत केली.
दिप्तीने एनइइटी परीक्षेमध्ये ७२० पैकी ५७४ गुण प्राप्त केले. त्यामुळे तेंडुलकर फाउंडेशन तर्फे तिला स्कॉलरशिप देण्यात आली. फाउंडेशनने शिक्षणाचा खर्च उचलल्याने, मी आता फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करेन असे दीप्ती म्हणाली आणि माझे डॉक्टर व्हायचे स्वप्न साकार झाले की, अथक परिश्रम घेऊन गरजू आणि अभ्यासू मुलांना नक्कीच मदत कारेन असे वाचन देते. सचिन तेंडुलकरनी, स्वप्नांचा पाठलाग करून, ते सत्यामध्ये उतरवणे काय असते, हे दिप्तीच्या प्रवासावरून कळते, तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, माझ्याकडून तिला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असे ट्विट केले आहे.
Dipti's journey is a shining example of chasing one's dreams and making them a reality.
Her story will inspire many others to work hard towards their goals.
My best wishes to Dipti for the future! https://t.co/n4BMOuP1yp— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 27, 2021