25.7 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeMaharashtraमहाराष्ट्रामध्ये जो नियम नारायण राणे यांना लावला गेला, तोच नियम आता नाना...

महाराष्ट्रामध्ये जो नियम नारायण राणे यांना लावला गेला, तोच नियम आता नाना पटोले यांना लागू होणार का? – आम. खोत

जशी त्वरित कारवाई नारायण राणे यांच्यावर केली गेली, तशीच नाना पटोले यांच्यावरही तत्काळ केली जाईल का,  असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधानांना संबोधून आणि नंतर शब्द फिरवून बोलणाऱ्या नाना पटोले यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल संपूर्ण राज्यात राजकारण तापले आहे. अनेकानी त्यांची अटकेची मागणी केली आहे तर काहींनी त्यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध केलेल्या निंदनीय वक्तव्याचे पडसाद सर्व राज्यभर उमटत आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाना पटोले यांना अटक करा अशी मागणी केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. नारायण राणे म्हणाले, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहेत. त्याचा मी निषेध करतो. कॉंग्रेसच्या नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य केले याबद्दल मला नवल वाटले नाही. आता नाना पटोले यांना अटक करण्याची जबाबदारी पूर्णतः पोलिसांची आहे. कारण हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी जोडला गेलेला आहे.

त्याचप्रमाणे राज्यात एका साठी एक न्याय आणि दुसऱ्यासाठी दुसरा अशी पद्धत आहे का याची विचारणा रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. काही महिन्यांपूर्वी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावरून राज्यात बराच वाद उफाळला होता. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलेच राजकारण तापले आहे. राज्यभरातून यावर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील ट्विट करत नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

ते म्हणाले,  महाराष्ट्रामध्ये जो नियम नारायण राणे यांना लावला गेला होता, तोच नियम आता नाना पटोले यांना लागू होणार का?  असा रोखठोक सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे. छत्री असूनही पावसात भिजणे आणि खुर्ची असूनही उभ राहणे. याला खरेपणा नाही तर दांभिकपणा म्हणतात. असा निशाणाही त्यांनी साधला आहे. जशी त्वरित कारवाई नारायण राणे यांच्यावर केली गेली, तशीच नाना पटोले यांच्यावरही तत्काळ केली जाईल का,  असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular