25.6 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeRatnagiriफासकीमध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू

फासकीमध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू

एका झाडाला अज्ञात व्यक्तीने वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी फासकी लावली होती. या फासकीमध्ये बिबट्या अडकून मृत पावला आहे.

संगमेश्वर तालुक्यातील धामापूर गावामध्ये आज एक मृत बिबट्या फासकीत अडकून मृत झालेला निदर्शनास आला आहे. गणपती विसर्जन घाट शेजारी कांबळे नामक ग्रामस्थांची जागा आहे. या जागेमध्ये एका झाडाला अज्ञात व्यक्तीने वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी फासकी लावली होती. या फासकीमध्ये बिबट्या अडकून मृत पावला आहे. गावातील शेतकरी आपली जनावरे त्या भागामध्ये चरण्यासाठी नेतात. बिबट्याला पाहून सर्व जनावरे बिथरली म्हणून शेतकऱ्यांच्या लक्षात हि गोष्ट येताच त्यांनी त्या जंगलमय भागाची पाहणी केली. यावेळी बिबट्या फासकीमध्ये अडकून मृत झाल्याचे त्यांना दिसले.

धामापूर येथे जंगलमय भागात बिबट्या फासकीत अडकून मृत झाल्याची ग्रामस्थांनी माहिती तात्काळ वनविभागाला कळवली. यानंतर देवरुखचे वनपाल तैफिक मुल्ला आणि वनरक्षक नानू गावडे यांनी घटनास्थळी पाहणी व पंचनामा केला. पोटाच्या भागाला फासकी लागून त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. वन्यप्राणी कितीही हिंस्रक असले तरी, त्यांच्या छाती आणि पोटाची त्वचा एकदम नाजूक असते, त्यामुळे बहुतांशी वन्यपशू हे अशा प्रकारच्या फासकीत सापडले तरी सुटका करताना धडपड करताना पोटाला किंवा छातीला इजा झाल्यावर मृत्युमुखी पडतात.

या मृत बिबट्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शव विच्छेदन करण्यात आले. मृत झालेला हा बिबट्या नर जातीचा व सात वर्षे पूर्ण वाढीचा असल्याची माहिती वनपाल मुल्ला यांनी दिली आहे. याच ठिकाणी बिबट्याला अग्नी देण्यात आला. परंतु प्रश्न आहे तो ही फासकी कोणी लावली? याचा वनविभागाचे अधिकारी शोध घेत आहेत. कारण आधीच वन्य जीवांची संख्या घटत असल्या कारणाने अशा घटना घडत असल्याने हि बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular