26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriरत्नागिरीत पुन्हा उपयुक्त पाळीव पशुच्या मांस विक्रीचा पर्दाफाश

रत्नागिरीत पुन्हा उपयुक्त पाळीव पशुच्या मांस विक्रीचा पर्दाफाश

संतप्त हिंदूत्ववादी नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसत होते.

रत्नागिरी शहरातील एकता मार्गावर असलेल्या एका अपार्टमेंटमधील वॉचमनच्या घरात उपयुक्त पाळीव प्राण्याचे मसिसदृश्य पदार्थ सापडल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एक पिशवी महिलेच्या हातात दिली. त्यातून प्राण्याचा पाय खाली पडला आणि या प्रकाराचा उलगडा झाला. सायंकाळी ५ वा. च्या सुमारास हा प्रकार घडला. हिंदूत्ववादी नागरिकांनी याठिकाणी धाव घेतली. पोलिसांना बोलावण्यात आले. वॉचमनच्या घरात शोध घेण्यात आला असता हे संशयास्पद मांस आढळून आले. पोलिसांनी वॉचमनसह पत्नीला चौकशीसाठी शहर पोलीस ठाण्यात पाचारण केले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात हिंदूत्ववादी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. संतप्त हिंदूत्ववादी नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसत होते.

रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या परिसरात उपयुक्त पाळीव प्राण्याचे मांस सापडण्याचे प्रकार घडले होते. मंगळवारी सायंकाळी पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. शहरात एकता मार्गावर असलेल्या एका अपार्टमेंटच्या वॉचम नच्या खोलीत हा प्रकार उघडकीस आला. मंगळवारी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती याठिकाणी आल्या. अपार्टमेंटच्या वॉचमनच्या खोलीतूने महिला बाहेर आली. तिच्या हाती त्या दोघांनी हातातील पिशवी दिली. यादरम्यान पिशवीतून एका प्राण्याचा पाय खाली पडला. यामुळे या प्रकाराचा उलगडा झाला. दरम्यान दुचाकीस्वार निघून गेले. आजूबाजूच्या हिंदुत्ववादी नागरिकांनी हे मांस कसले आहे? याची चौकशी केली. प्रकार संशयास्पद असल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली.

काही वेळांतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वॉचमनच्या खोलीत जाऊन शोध घेतला असता एका भांड्यात मांस आढळून आले. हे म ांस उपयुक्त पाळीव प्राण्याचे असल्याचा संशय व्यक्त होत आहे. तपासणीसाठी हे मांस ताब्यात घेण्यात आले. एव्हाना हे वृत्त कर्णोपकर्णी झाले. शेकडो हिंदूत्ववादी नागरिक याठिकाणी गोळा झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी येथील वॉचमन रणजित दमाई व त्याच्या पत्नीला पोलीस ठाण्यात पाचारण केले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. हे मांस कुठून आले? याचा शोध घेतला जात होता. दरम्यान, संशयास्पद मांस सापडल्यानंतर याचा शोध पोलीस कसा घेणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. संशयितांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी नागरिक प्रचंड संतप्त झाल्याचे चित्र पहायला मिळत होते. रात्री उशिरापर्यंत शेकडो नागरिक शहर पोलीस ठाण्यातच ठाण मांडून होते.

RELATED ARTICLES

Most Popular