29.4 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeEntertainmentसलमान खानला मिळणार Y+ सुरक्षा

सलमान खानला मिळणार Y+ सुरक्षा

पंजाब पोलिसांच्या चौकशीदरम्यान लॉरेन्सने सलमान खानला धडा शिकवण्यासाठी त्याला मारायचे असल्याचे सांगितले होते.

काळवीट शिकार प्रकरणामुळे लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती, कारण लॉरेन्स हा बिश्नोई समाजातील आहे. त्यामुळे जेव्हा काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला आरोपी बनवण्यात आले तेव्हा लॉरेन्स संतापला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांच्या चौकशीदरम्यान लॉरेन्सने सलमान खानला धडा शिकवण्यासाठी त्याला मारायचे असल्याचे सांगितले होते.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मुंबई पोलिसांकडून Y+ सुरक्षा देण्यात येणार आहे. वास्तविक, सलमानला बऱ्याच दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या, त्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचा आरोप असलेल्या टोळीकडून त्याला धमक्या येत होत्या.

सलमानसोबतच महाराष्ट्र सरकारने अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांच्या सुरक्षेतही वाढ केली आहे. त्याला एक्स श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे. या सुरक्षा श्रेणीमध्ये एकूण ११ लोक आहेत, त्यापैकी २ शिपाई आणि २ पीएसओ देखील समाविष्ट आहेत आणि उर्वरित इतर पोलीस आहेत. म्हणजेच आता सलमानसोबत ११ जवान त्याच्या सुरक्षेसाठी सदैव त्याच्यासोबत उभे राहणार आहेत.

सलमानला मारण्यासाठी लॉरेन्सने ४ वेळा योजना आखली आहे. यासाठी त्याने एक रायफलही खरेदी केली होती. लॉरेन्सने २०१८ मध्ये सलमानला मारण्यासाठी नेमबाज संपत नेहराला मुंबईत पाठवले होते. संपतकडे पिस्तूल होते. मात्र, सलमान पिस्तुलाच्या रेंजपासून खूप दूर होता. त्यामुळे तो त्यांना मारू शकला नाही. यानंतर त्याने लांब पल्ल्याची रायफल खरेदी केली. त्यानंतर संपत सलमानला मारण्यासाठी आला, पण त्याला मारण्याआधीच तो पकडला गेला. यानंतर लॉरेन्सने त्याला आणखी २ वेळा मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला सलमानला मारण्याची संधी मिळाली नाही.

RELATED ARTICLES

Most Popular