26 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

एसटी प्रशासनाकडून लोकेशन अॅप’ची केवळ घोषणा

लालपरी'चे अचूक ठिकाण मोबाईलवर दिसेल, बस वेळेवर...

पीकविमा योजनेत खेड-दापोली आघाडीवर…

प्रधानमंत्री पीकविमा योजना यंदा नव्या स्वरूपात रत्नागिरी...

परतीचा प्रवास ठरला कोंडीचा… वाहनांच्या रांगा

गौरी-गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बुधवारपासून सुरू...
HomeEntertainmentसलमानने पार्टीत अशी एन्ट्री का घेतली !

सलमानने पार्टीत अशी एन्ट्री का घेतली !

सलमान मुख्य गेटवर पोहोचताच कारमधून खाली उतरला तेव्हा त्याच्या हातात काचेचा ग्लास होता.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान नुकताच एका पार्टीला जाताना दिसला. मुराद खेतानी यांच्या बर्थडे पार्टीतील आहे. या दरम्यान गाडीतून उतरताना तो अशा अवस्थेत दिसला, जे पाहून सगळेच हैराण झाले. वास्तविक, सलमान मुख्य गेटवर पोहोचताच कारमधून खाली उतरला तेव्हा त्याच्या हातात काचेचा ग्लास होता. पापाराझीला पाहून तो ग्लास लपवण्याचा प्रयत्न करू लागला. मग काही समजले नाही तेव्हा त्याने तो ग्लास समोरच्या खिशात टाकला.

सलमानला असे पाहून सर्वांनाच प्रश्न पडतो की त्याने पार्टीत अशी एन्ट्री का घेतली? त्यानंतर पार्टीतून बाहेर पडताना सलमानही याच ग्लास सोबत स्पॉट झाला होता. विशेष म्हणजे यावेळी सलमानने हातात ग्लास धरला होता. त्याचबरोबर सलमानची ही स्टाईल पाहून युजर्सचे म्हणणे आहे की त्याच्या ग्लासात ड्रिंक होते.

गोंधळलेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर लिहिले, ‘भाई, ग्लासमध्ये काय होते?’, तर दुसऱ्याने प्रश्न केला, ‘ये पानी है?’ तर तिसऱ्याने लिहिले, ‘पॅन्टच्या खिशात ग्लास. भावाची नवीन शैली. अशा विविध प्रकारच्या कमेंट्स सोशल मिडिया वर दिसू लागल्या. त्यामुळे सलमानच्या या खास प्रकारच्या एन्ट्रीबद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे.

सलमानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच कतरिना कैफसोबत ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर तो प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो ‘गॉडफादर’ (तेलगु भाषा), ‘पठाण’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये दिसणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular