22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraसमीर वानखेडे चैत्यभूमीवर, नवाब मालिकांना हायकोर्टाच्या आदेशाचा विसर

समीर वानखेडे चैत्यभूमीवर, नवाब मालिकांना हायकोर्टाच्या आदेशाचा विसर

क्रुझ ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबीचे समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांची चांगलीच जुंपली होती. गेल्या काही महिन्यांपासून जात, नोकरी, धर्म यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. मात्र यावेळी तेथून बाहेर जात असताना त्यांच्या विरोधक आणि समर्थकांमध्ये वाद पहायला मिळाला. समीर वानखेडे, बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन बाहेर आले असता काही भीमसैनिकांनी त्यांच्या चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येण्याकरता आक्षेप घेतला. यामुळे काही काळासाठी तेथे वाद निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

जाती आणि धर्माच्या मुद्यावरून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांचे आरोप-प्रत्यारोप सुरु होते आणि अजूनही आहेतच. परंतु, हायकोर्टाने दिलेल्या निर्देशावरून मलिक यांनी काही दिवस शांत राहायचे ठरवले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त समीर वानखेडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले असता, भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं वानखेडेंच्या या उपस्थितीवर आक्षेप नोंदवला. समीर वानखेडेंना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही अशी ठाम आणि स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली.

यानंतर काही मिनिटांच्या फरकाने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक देखील आंबेडकराना अभिवादन करण्यासाठी पाठोपाठ चैत्यभूमीवर पोहोचले. त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी म्हटलं की, बाबासाहेबांना अभिवादन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. अभिवादन करणार्याना कोणत्याही जाती धर्माचे बंधन नाही. आम्ही दरवर्षी इथे येतो. काही लोकांनी नव्याने इथे येणं सुरु केलं आहे हे त्यांच्यासाठी चांगलंच आहे,  असं नवाब मलिक यांनी अनपेक्षित टोला लगावला.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, हा जो मी संघर्ष सुरु केला आहे, त्याचा जय भीम इम्पॅक्ट सुरु झाला आहे, असं वाटतं आहे. पुढे पत्रकारांनी डिवचले असता, याआधी तुम्ही कोणी समीर वानखेडेना चैत्यभूमीवर आल्याचं पाहिलं आहे का?  या प्रश्नावर बोलताना त्यांना त्याबद्दल माहिती नाही,  पण माझ्यासोबत नमाज पठण करायचे हे खरं आहे असा अप्रत्यक्ष टोलाही लगावला. पण असे बोलताना नकळत त्यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, वानखेडे कुटुंबावर टीका टिपण्णी आरोप करणे थांबविण्याचे आदेश देण्यात आले होते.

RELATED ARTICLES

Most Popular