25.6 C
Ratnagiri
Wednesday, September 18, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeRatnagiriइंडिया आघाडीच्या पायाखालची सरकली वाळू - बाळ माने

इंडिया आघाडीच्या पायाखालची सरकली वाळू – बाळ माने

इंडिया आघाडीला इशारा देतो की, २०२४ ला भाजपाचा महाविजय निश्चित आहे.

संसद है लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर आहे. या उपराष्ट्रपती व राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांचा अवमान खासदार बॅनर्जीनी केला. त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतोय. आज भाजपचा देशभर डंका आहे. त्यामुळे काँग्रेस व इंडिया आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अधिवेशनात लोककल्याणकारी कायदे संमत आहेत; परंतु त्यांच्या चर्चेत सहभाग न घेता काँग्रेस व इंडिया आघाडी लोकसभा व राज्यसभेत गोंधळ घालत आहेत, अशा शब्दांत भाजपचे माजी आमदार तथा विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांनी निषेध केला. माफी मागा, राहुल गांधी माफी मागा, संसद में नहीं चलेगी नौटंकी, अशा घोषणा देत काँग्रेस नेते राहुल गांधी व तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

निषेध आंदोलनानंतर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. या वेळी बाळ माने म्हणाले, एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राज्यसभेचे कामकाज चालवताना बॅनर्जीनी अवमान केला व राहुल गांधींनी त्याला बळ दिले, त्यांचा आम्ही निषेध करतो. इंडिया आघाडीला इशारा देतो की, २०२४ ला भाजपाचा महाविजय निश्चित आहे. हिवाळी अधिवेशनावेळी उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचा अवमान करणारे वक्तव्य व असभ्य, अशोभनीय वर्तन खासदार बॅनर्जी यांनी केले.

राहुल गांधी हे त्याचे चित्रण करत होते. त्याचा जोरदार निषेध भाजपाने केला. विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, शहराध्यक्ष राजन फाळके यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या वेळी सतेज नलावडे, विक्रम जैन, दादा ढेकणे, प्रशांत डिंगणकर, योगेश मुळ्ये, सचिन वहाळकर, सचिन करमरकर, उमेश कुळकर्णी, मुन्ना चवंडे, राज पटवर्धन, शैलेश बेर्डे, मंदार मयेकर, नंदू चव्हाण, नितीन जाधव, संतोष बोरकर, लीलाधर भडकमकर, संकेत कदम आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular