29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...

चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था

शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या...

धामणीत काजू कारखाना आगीत खाक…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे चंद्रकांत गणू...
HomeRatnagiriसनगलेवाडी गावाची नवी ओळख

सनगलेवाडी गावाची नवी ओळख

संगमेश्‍वरातील वांझोळे-सनगलेवाडी या गावाने गावामधील शाळेत बदली होवून आलेल्या प्राथमिक शिक्षकाने मुलांना खो-खोचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आणि काही वर्षातच या गावाने खो-खो खेळासाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूदेखील निर्माण केले आहेत.

कोकणामध्ये ग्रामीण भागातून शैक्षणिक आणि खिलाडूवृत्तीचे अनेक विद्यार्थी पारंगत होत आहेत. शिक्षण आणि खेळासाठी कोकणातील वातावरण पूरक तर आहेच पण सोबत जोड हवी ती योग्य मार्गदर्शनाची. कोकणच्या ग्रामीण भागातील मुलांमध्ये विविध प्रकारच्या कला कौशल्य दडलेली असतात, पण यांना वाव मिळणे गरजेचे असते. योग्य वयात त्यांच्यातील या क्षमता ओळखून त्यांना अचूक मार्गदर्शन मिळाले तर कोकणचे हिरे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरदेखील चमकू शकतात.

संगमेश्‍वरातील वांझोळे-सनगलेवाडी या गावाने गावामधील शाळेत बदली होवून आलेल्या प्राथमिक शिक्षकाने मुलांना खो-खोचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आणि काही वर्षातच या गावाने खो-खो खेळासाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूदेखील निर्माण केले आहेत. शिक्षक सदानंद आग्रे यांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने हे सिद्ध करून दाखवले आहे.

सनगलेवाडीतील मुलांची जिल्हास्तरावर खो-खो खेळात मिळणार्‍या यशामुळे, जिल्हा खो-खो संघात निवड झाली आहे. त्याचप्रमाणे या मुलांनी राज्यस्तरावर केलेल्या अभूतपूर्व कामगिरीमुळे, मिळालेल्या यशामुळे त्यांचा समावेश राष्ट्रीय स्तरावरील संघामध्ये करण्यात आला आहे.

एखाद्या गावाचे नाव सुद्धा एखाद्या अशाच प्रकारच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मानाने सर्वत्र घेतले जाते. तशीच या सनगलेवाडी गावाची सुद्धा कथा आहे. या ग्रामीण भागातील गावामधील खेळामध्ये उत्तुंग शिखर गाठणारे अनेक हिरे असल्याने, विशेष म्हणजे मुलगे आणि मुली या दोन्ही संघामध्ये सर्वाधिक खेळाडू हे सनगलेवाडीतील असल्याने या गावाला आता खो-खो खेळाचे गाव म्हणून प्रसिद्धी मिळू लागली आहे. आणि यापुढे सुद्धा अशाच निष्ठावान खेळाडूंमुळेच जगभरात गावाची ओळख निर्माण होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular