28.9 C
Ratnagiri
Sunday, February 5, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeRatnagiriसंगमेश्वर परचुरी येथील नदीतील बेपत्ता दोघांचे मृतदेह सापडले

संगमेश्वर परचुरी येथील नदीतील बेपत्ता दोघांचे मृतदेह सापडले

पालखीबरोबर जा, नदीवर अथवा पोहायला जाऊ नका असे घरातील माणसांनी बजावले असून देखील हे तरूण नदीवर पोहायला गेले.

संगमेश्वर तालुक्यातील परचुरी येथील शनिवारी दुपारी १ वा. ७ जण पोहण्यासाठी नदीवर गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दोघे जण बुडल्याची घटना घडली असून त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. संकेत सहदेव कळंबटे व प्रमोद रामचंद्र कळंबटे अशी त्यांची नावे असून त्यांचा अजून शोध लागलेला नाही.

सध्या शिमगोत्सव सुरु असल्याने गावोगावच्या प्रथा परंपरा वेगवेगळ्या. शनिवारी परचुरी गावचे शिंपणे उत्सव होता. सर्व मंडळी पालखी बरोबर होती. तुम्हीही पालखीबरोबर जा, नदीवर अथवा पोहायला जाऊ नका असे घरातील माणसांनी बजावले असून देखील हे तरूण नदीवर पोहायला गेले. संकेत आंघोळ करत असताना त्याचा पाय घसरून तो पाण्याबरोबर पुढेपुढे वाहत जाऊ लागला. हे पाहताच प्रमोद त्याला पकडण्यासाठी गेला असता तोही पाण्याबरोबर पुढे जाऊन दोघेही बेपत्ता झाले. पोलिस घटनास्थळी त्यांना शोधायचे काम सुरू आहे.

शोधा दरम्यान परचुरी येथे बुडून बेपत्ता झालेल्या दोघाचे मृतदेह दुसऱ्या दिवशी रविवारी दिनांक २७ मार्च रोजी सकाळी ग्रामस्थांना मिळाले. परचुरी कळंबटे वाडी येथील प्रमोद रामचंद्र कळंबटे वय ३५ वर्ष, संकेत सहदेव कळंबटे वय १२ वर्ष यांचे मृतदेह हाती लागले आहेत. संकेत याला वाचविण्याच्या प्रयत्नात असताना प्रमोद कळंबटे याचा देखील पाण्यामध्ये बुडून मृत्यू ओढवला.

नदीला भरती आल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघेही नदीमध्ये प्रवाहासोबत वाहत दूरवर गेल्याने पाण्यात बेपत्ता झाले. गावकऱ्यांनी त्वरित शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांचे प्रयत्न असफल झाले. उत्सवाच्या वेळी घडलेल्या या दु:खद घटनेने सर्व गावावर शोककळा पसरली.

RELATED ARTICLES

Most Popular