26.7 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeRatnagiriजिल्ह्यात दीड महिन्यात गावठी बॉम्ब सापडण्याची तिसरी घटना

जिल्ह्यात दीड महिन्यात गावठी बॉम्ब सापडण्याची तिसरी घटना

एका मध्यप्रदेशातील व्यक्तीला जिल्हा दहशतवाद विरोधी पथक व बॉम्ब नाशक पथकाने रंगेहाथ पकडले असून या व्यक्तिकडे तब्बल १६२  जिवंत गावठी बॉम्ब सापडले आहेत.

संगमेश्वर तालुका पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गावठी बॉम्ब सापडल्याने चर्चेत आला आहे. एकाच वेळी तब्बल १६२ गावठी बॉम्ब सापडले असून या बॉम्बचा वापर शिकारीसाठी केला जात होता की अन्य कोणत्या कारवाईसाठी याचा पोलीस कसून तपास करत आहेत. शिवधामापूर येथे एका मध्यप्रदेशातील व्यक्तीला जिल्हा दहशतवाद विरोधी पथक व बॉम्ब नाशक पथकाने रंगेहाथ पकडले असून या व्यक्तिकडे तब्बल १६२  जिवंत गावठी बॉम्ब सापडले आहेत. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

जिल्हा दहशतवाद विरोधी पथक व बॉम्ब नाशक पथकाला संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर येथे गावठी बॉम्ब घेऊन एक व्यक्ती येणार असल्याची खबर मिळालेली. मागील दीड महिन्यात जिल्ह्यामध्ये गावठी बाँम्ब सापडण्याची हि तिसरी घटना उघडकीस आली असून त्यातील दोन घटना या संगमेश्वर तालुक्यामध्येच घडल्या आहेत.

गुरुवारी दहशतवाद विरोध पथकाने तातडीने सापळा रचून शिवधामापूर गावच्या हद्दीत जंगल परिसरात एका बंद शेत घराशेजारी, पथकातील कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, ही व्यक्ती मध्यप्रदेशातील राहणारी असून त्याने आपले नाव कल्लू कथालाल बहेलिया असल्याचे सांगितले. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ही कारवाई करण्यात आली. बॉम्ब शोधक पथकाने बॉक्समधील वस्तू हि स्फोटक असल्याचे स्पष्ट केल्यानंतर बहेलिया याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार या जिवंत गावठी बॉम्बचा वापर डुक्कर व रानटी प्राणी मारण्यासाठी केला जात असल्याची माहिती पुढे आली.

परंतु, या बॉम्बचा मानवी वस्तीमध्ये स्फोट झाला तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे संगमेश्वर पोलीस स्थानकात बहेलिया याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular