26.1 C
Ratnagiri
Monday, September 8, 2025

जागा खरेदीसाठीही मिळणार घरकुल योजनेतंर्गत आर्थिक मदत

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे स्वतःची जमीन नसल्यामुळे...

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षक भिंत कोसळली; सीएनजीचा पुरवठा बंद

मंडणगड मधील एचपीसीएल कंपनीच्या नोबेल ऑटो पेट्रोल...

रत्नागिरी पॅसेंजरसाठी २ ऑक्टो. ला जल फाऊंडेशनचे लाक्षणिक उपोषण

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे मध्य...
HomeSportsमॉडेल आयशामुळे सानिया-शोएबचा घटस्फोट झाला का?

मॉडेल आयशामुळे सानिया-शोएबचा घटस्फोट झाला का?

सानिया-मलिकच्या जवळच्या मित्राने सांगितले की, दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला आहे.

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. हा दावा शोएबच्या एका जवळच्या मित्राने केला आहे, जो त्याच्या मॅनेजमेंट टीमचा भाग आहे. तो म्हणाला- मी दोघांच्या घटस्फोटाची पुष्टी करू शकतो, पण यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही. घटस्फोटाच्या अफवांदरम्यान मलिकची मॉडेल आयशा कमरची मुलाखत व्हायरल होत आहे.

यामध्ये मलिकने खुलासा केला होता की, फोटोशूट दरम्यान आयशाने मला खूप मदत केली होती. वास्तविक, २०२१ मध्ये मलिकने आयशासोबत एक बोल्ड फोटोशूट केले होते. आता हे सर्व फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सानिया आणि शोएबचे लग्न १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये झाले. १५ एप्रिल रोजी लाहोरमध्ये रिसेप्शन देण्यात आले होते. दोघांना एक मुलगा इझान आहे. त्याचा जन्म २०१८ मध्ये झाला.

सानिया-मलिकच्या जवळच्या मित्राने सांगितले की, दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला आहे. काही औपचारिकता आहेत, ज्या अजूनही टिकून आहेत. दोघेही सध्या वेगळे राहतात. सानिया सध्या दुबईत आहे, तर मलिक पाकिस्तानात आहे. घटस्फोटाच्या बातम्यांना सानियाच्या सोशल मीडिया पोस्टवरून अधिक हवा मिळत आहे. सानियाने ताज्या पोस्टमध्ये लिहिले – तुटलेली हृदये कुठे जातात?

सानिया आणि शोएब ३० ऑक्टोबरला एकत्र दिसले होते. निमित्त होते मुलगा इझानच्या वाढदिवसाचे. शोएबने फोटो पोस्ट केला, पण त्याने जे लिहिले त्यावरून लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. शोएबने लिहिले, “जेव्हा तुझा जन्म झाला, तेव्हा आमच्यासाठी जीवनाचा विशेष अर्थ होता. आम्ही कदाचित एकत्र नसू, कदाचित आम्ही दररोज भेटू शकत नाही, परंतु बाबा प्रत्येक क्षणी तुझा आणि तुझ्या हसण्याचा विचार करत राहतो. बाबा आणि आई तुझ्यावर प्रेम करतात.”

RELATED ARTICLES

Most Popular