27.7 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

कडवईच्या डॉक्टरांची हजारो रुपयांची ऑनलाईन फसवणूक

जिल्ह्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या...

आंबा घाटात झालेल्या ट्रक अपघातात, महिला जागीच ठार

रत्नागिरीला जोडणाऱ्या महामार्गांवर एक दिवस आड अपघातांची...
HomeEntertainmentसुपरस्टार थलपथी विजयसोबत तामिळ चित्रपटसृष्टीत संजय दत्त करणार पदार्पण

सुपरस्टार थलपथी विजयसोबत तामिळ चित्रपटसृष्टीत संजय दत्त करणार पदार्पण

दिगदर्शक लोकेश यांनी बॉलिवूड अभिनेता संजय दत्तलाही त्याच्या पुढच्या चित्रपटात फायनल केले आहे.

दक्षिण भारतीय चित्रपट दिग्दर्शक लोकेश कनगराज त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या बातम्या काही काळापूर्वी आल्या होत्या. याबद्दल विजयचे चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान, अशीही बातमी येत आहे की, दिगदर्शक लोकेश यांनी बॉलिवूड अभिनेता संजय दत्तलाही त्याच्या पुढच्या चित्रपटात फायनल केले आहे. मात्र, चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

या चित्रपटात संजय दत्त एका गँगस्टरच्या अवतारात दिसणार आहे. खरे तर लोकेश कनगराजचा हा चित्रपट गँगस्टरवर आधारित अॅक्शन थ्रिलर थीमवर आधारित आहे. त्यामुळेच पटकथेत अनेक खलनायकांची गरज भासते. अशा परिस्थितीत खलनायकाच्या भूमिकेत संजय दत्तपेक्षा चांगला पर्याय नाही. सूत्रांवर विश्वास ठेवला तर लोकेश काही काळ संजय दत्तसोबत या भूमिकेबद्दल चर्चा करत होता. अखेर त्याने १० कोटी रुपये फी घेऊन संजय दत्तला फायनल केले आहे. या चित्रपटात विजय आणि संजय दत्तला एकत्र पाहणे खूप मनोरंजक असणार आहे.

लोकेश कनगराज हिंदी भाषिक पट्ट्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरला आहे. त्यांचा विक्रम हा चित्रपट उत्तर भारतीय पट्ट्यात खूप आवडला होता. हे यश पाहून लोकेश साऊथचा सुपरस्टार विजयसोबत एक मोठा चित्रपट बनवण्याचा विचार करत आहे. यामुळेच हा चित्रपट संपूर्ण भारताचा असेल आणि त्यासाठी चांगले बजेट खर्च केले जाईल. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचेही वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाची शूटिंग या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. त्याचबरोबर पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular