अभिनेता संजय दत्त याला युएइ, दुबई या देशाचा गोल्डन विजा मिळाला आहे. ही बातमी त्याने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केली असून त्याबरोबर दोन फोटो शेअर केले आहेत त्यामध्ये एका फोटोमध्ये दुबई चे डायरेक्टर जनरल मोहम्मद अहमद मारी बरोबर पासपोर्ट दाखवताना दिसून येतात व दुसऱ्या फोटोमध्ये मेजर जनरल मोहम्मद अलमारी यांच्यासोबत दिसून येतात.
जास्त काळ वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींना तसेच प्रतिभाशाली व्यक्तींना विशेषतः पीएचडी होल्डर्स डॉक्टर इंजिनीयर,पी.एच.डी. करणारे, स्पेशालिस्ट डॉक्टर, संशोधक, कलाकार यांना गोल्डन विजा देण्यात येतो. दुबई सरकारने सन 2020 मध्ये हा गोल्डन विजा जाहीर केला आहे. या विजा मुळे संजय दत्त याला दुबईमध्ये वास्तव्य करता येणे शक्य होणार आहे तसेच तो व्यवसायही करू शकतो. त्याची वैधता जास्तीत जास्त दहा वर्षे अशी आहेत त्यानंतर पुन्हा अर्ज भरून त्याची वैधता वाढवता येते याचा कालावधी दहा वर्ष आहे. दुबई सरकारने आपल्या देशात स्पेशालिस्ट डॉक्टर, संशोधक,उद्योगपती तसेच कलाकार यांना यावेळी आकर्षित करून व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूणच याप्रकारच्या सल्लग्नतेमुळे दुबई देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भर पडणार आहे.
संजय दत्त सांगतो, यूएई सरकारने दिलेला गोल्डन वीजा स्वीकारताना मला खूपच आनंद होत आहे व त्यांचे मी यूएई सरकारचे धन्यवाद व्यक्त करतो. भारतामध्ये अभिनेता संजय दत्त हा एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे ज्याला यूएई सरकारचा गोल्डन विजा मिळाला आहे. संजय दत्त यांचा ह्या वर्षीचा पहिला चित्रपट केजीएफ २ हा लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे ज्यामध्ये संजय दत्त हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात १६ जुलै ला प्रदर्शित होईल असे सांगितले जात आहे आणि या चित्रपटाचा पूर्वार्ध अर्थात पहिला भाग हा ब्लोकबस्टर ठरल्याने या चित्रपटाची उत्कंठा रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची ताणली गेली आहे.