28.9 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeRatnagiriरत्नागिरीतील प्रशालेचा अद्भुत निर्णय

रत्नागिरीतील प्रशालेचा अद्भुत निर्णय

चिपळूण मधील इंडियन सायंटिफिक एज्युकेशन सोसायटीचे एसीबी इंटरनशनल स्कूल आणि एसबी प्ले स्कूलच्या वतीने घेतल्या गेलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले गेले आहे. कोविड -१९ च्या महामारीमध्ये दोन्ही पालक गमावलेल्या मुलांसाठी या शाळेच्या संस्थेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरीमधील कापसाळ चिपळूण येथील एसीबी इंटरनशनल स्कूलने कोरोनाच्या विळख्यात सापडून दोन्ही पालकाना गमावलेल्या अनाथ मुलांना मोफत शिक्षण तसेच मुलांच्या संर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. कोरोना काळामध्ये पालकत्व गमावून अनाथ झालेल्या मुलांची जबाबदारी जरी शासनाने घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचा समाजशील निर्णय घेणारी रत्नागिरी जिल्ह्यातील एसीबी इंटरनशनल स्कूल ही एकमेव शाळा ठरली आहे.

या बाबत माहिती देताना चेअरमन अमोल भोजने म्हणाले कि, प्रशालेमध्ये नर्सरी पासून सातवी पर्यंतचे वर्ग असून, प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक रित्या लक्ष पुरविले जाते. कोरोना काळात पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांना दिल्ली बोर्डाचे सीबीएसई पॅटर्नचे शिक्षण या मुलांना देण्यात येणार आहे. भविष्यामध्ये शिक्षणामुळे या मुलांची कोणत्याही प्रकारे कुचंबणा होता कामा नये, चांगले शिक्षण असले कि, भविष्य सुद्धा सुरक्षित होण्यासाठी त्या मुलांना मदतच होईल. त्यामुळे सोमवारी झालेल्या संस्थेच्या बैठकीमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोफत शिक्षणासोबत ज्या ज्या सुविधा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत, त्या पुरविण्याकडे आमचा कल राहील असे संस्थेचे चेअरमन भोजने यांनी सांगितले. प्रशालेने घेतलेल्या या अद्भुत निर्णयाबाबत सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular