बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत कायम विविध कारणांनी चर्चेत असते. त्याचप्रमाणे ती आपल्या बिनधास्त वागणे आणि बोलण्यासाठी सुद्धा खूपच प्रसिद्ध आहे. तिच्या वेगवेगळ्या विषयांवरील वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. कंगना राणावत हिला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल एकच गहजब उडालेला दिसत आहे.
कंगनाने नुकतेच देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. ती म्हणालेली १९४७ मध्ये भीक मिळाली, स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळाले, असं वक्तव्य एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमामध्ये तिने केलं. कंगनाच्या या स्वातंत्र्या बाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्याचप्रमाणे, कंगनाचे ते वक्तव्य म्हणजे देशाचा अवमान असल्याचं राऊतांनी म्हटल आहे. तसंच कंगनाला देण्यात आलेले सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेण्यात यावे अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, सलमान खुर्शीद हे सुद्धा पुरुषी वेषातले कंगनाबेनच आहेत. अशा प्रकारची वक्तव्यं करुन हे विद्वान म्हणवणारे लोक निव्वळ राहुल गांधींना आणि काँग्रेसला अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. कंगनाच्या वक्तव्याने जसा देशाचा अपमान झाला तसाच या वक्तव्यानेही देशाचा अपमान झाला आहे. खरं तर भाजपनेच अशा देशाच्या स्वातंत्र्यावर आक्षेपार्ह बोलणार्यांचा पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची मागणी करण्यास पुढाकार घ्यायला हवा होता. पुढे राऊत म्हणाले, जो पर्यंत कंगनाचे पुरस्कार मागे घेत नाहीत. तोपर्यंत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचा अधिकार सरकारला नाही. ही संपूर्ण देशाची मागणी आहे’
एका मुलाखतीत कंगना हिनं केलेल्या स्वातंत्र्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. एका प्रश्नाच्या उत्तरावर कंगना म्हणाली की, देशाला स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं असेल, तर त्याला स्वातंत्र्य म्हणता येईल का? राणी लक्ष्मीबाई, नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर या लोकांबाबत बोलायचं झाल्यास, या सर्वांना माहित होतं की रक्त सांडलं तर हे लक्षात ठेवावं लागेल की हे आपल्या भारतीयांचं नसेल. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हतं. भीक होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्येच मिळाले आहे.