26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeDapoliशिवसेनेची अवस्था कही ख़ुशी कही गम, परबांना कोर्टाचा समन्स

शिवसेनेची अवस्था कही ख़ुशी कही गम, परबांना कोर्टाचा समन्स

१४ डिसेंबरच्या सुनावणीला हजर रहाण्याचे आदेश दापोली कोर्टाने दिले आहेत.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा जामीन कोर्टाने मंजूर केल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये एक प्रकारे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचा जुना आणि  उद्धव ठाकरेंच्या जवळचा पदाधिकारी मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दापोली कोर्टाने साई रिसॉर्ट घोटाळ्यासंदर्भात अनिल परब यांना समन्स बजावले आहेत आणि १४ डिसेंबरला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

दापोली तालुक्यातील मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी सुनावणी सुरू आहे. चार दिवसांपूर्वी पंचायत समिती गटविकास अधिकारी रुपा दिघे यांनी सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी भा.द.वि. ४२० नुसार अनिल परब यांच्यासह मुरुड ग्रामपंचायत तत्कालीन सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक यांच्या विरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. सीआरझेडमध्ये बांधकाम केल्याच्या आरोपां प्रकरणी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कोर्टात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

दापोली कोर्टाने माजी पालकमंत्री अनिल परब यांच्यासह तिघांना समन्स बजावले आहे. पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५ अन्वये समन्स जारी करण्यात आले आहे. १४ डिसेंबरच्या सुनावणीला हजर रहाण्याचे आदेश दापोली कोर्टाने दिले आहेत. केंद्रीय पर्यावरण विभागाच्या दाखल केलेल्या खटल्यावर बुधवारी ९ नोव्हेंबरला दापोली कोर्टात सुनावणी झाली. पर्यावरणसंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हा खटला दाखल केला आहे. अॅड. प्रसाद कुवेसकर यांनी पर्यावरण विभागाच्या वतीने युक्तीवाद केला.

केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली कोर्टात अनिल परब यांच्या विरोधात दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण खात्याचे वकील अॅड. प्रसाद कुवेसकर यांनी दिली. मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular