28.4 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

कामगारांना वेतन २५ हजार मिळतात फक्त ९ ते १० हजार – महानिर्मिती अधिकारी

पोफळी येथील महानिर्मिती विभागात १८० कामगार ठेकेदार...

राज आणि माझ्यातील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला : उद्धव ठाकरे

महायुत्ती सरकारने महाराष्ट्रातील शालेय शिक्षणक्रमात पहिलीपासून हिंदी...

बनावट कागदपत्राने वाहने विकणारी टोळी पकडली…

कोल्हापूर टेंबलाईवाडी (ता. करवीर) येथील जुन्या वाहनांची...
HomeMaharashtraसंजय राऊतांच्या “त्या” आक्षेपार्ह शब्दावरून वादंग

संजय राऊतांच्या “त्या” आक्षेपार्ह शब्दावरून वादंग

शिवसेनेचे खास. संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगबगीने बसण्यासाठी खुर्ची आणून दिल्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोवरुन काही विरोधकांनी संजय राऊतांची खिल्ली उडवून चेष्टा केली होती. यावर संजय राऊतांचा संताप अनावर झाला.

यावेळी प्रत्युत्तरादाखल बोलताना संजय राऊत म्हणाले की, वडिलधाऱ्यांचा आदर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. जरी लालकृष्ण अडवाणी असते तरी मी खुर्ची दिली असती. महाराष्ट्रातल्या एका पितृतुल्य माणसाला मी खुर्ची आणून दिली. ही गोष्ट जर कुणाला आवडली नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून ती विकृती आहे,  अशा शब्दात राऊतांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी टीका करणारां बाबत अपशब्द देशील वापरले. त्यामुळे पुन्हा वादंग सुरु झाला आहे.

बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरु आहेत. आणि त्यांनी मला हा संस्कार दिला आहे. मोठ्यांचा आदर करावा. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. हे या चू** लोकांना कळत नाही. ही चू**गिरी बंद करा. अशा विकृतीमुळे तुमचं राज्य महाराष्ट्रात कधीही येणार नाही. हा तुमच्या डोक्यात भरलेला कचरा आहे. हा कचरा जर तुम्ही वेळीच साफ केला नाहीत, तर डंपिंग ग्राऊंडमध्ये तुम्हाला लोक गाडून टाकतील.  हे मी तुम्हाला ऑनरेकॉर्ड सांगतो आहे. मोठ्या लोकांना बसायला खुर्ची देण्यानं जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेण्याच अधिकार नाही.

राऊत म्हणाले की, शरद पवार यांचे प्रकृती स्वास्थ आणि त्यांना होणारा त्रास जास्त आहे. आपण बसतो तसं त्यांना खाली बसता येत नाही. म्हणून त्यांना खुर्ची आणून दिली. मी खुर्ची लालकृष्ण अडवाणी, मुलायम सिंह यादव,  मुरली मनोहर जोशी असे जेष्ठ नेते जरी असते तरी आणूनच दिली असती. हे जरी  राजकीय विरोधक असले तरी ते पितृतूल्य व्यक्तिमत्व आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी घाईने धावत जात बसण्यासाठी खुर्ची आणत असल्याच्या फोटोवरुन, होणाऱ्या भाजपा नेत्यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरुन भाजपा नेते आक्रमक झाले असून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या दरम्यान संजय राऊत यांनी याबाबत पुन्हा एक ट्वीट करत आपल्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular