30.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...

यंदा परीक्षा लवकर होणार १० वी, १२ वीच्या तारखा जाहीर

एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे दहावी...
HomeRatnagiriरामटेक येथील संस्कृत विद्यापीठाचे पहिले उपकेंद्र रत्नागिरीमध्ये, उद्घाटन संपन्न

रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाचे पहिले उपकेंद्र रत्नागिरीमध्ये, उद्घाटन संपन्न

रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु केले जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे पहिले उपकेंद्र रत्नागिरीत स्थापन होत आहे. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु केले जात आहे. २० हजार चौरस फुटांहून जास्त परिसरामध्ये संगणक लॅब, डिजिटल वर्गासह, योगाभ्यास कक्ष आदी अनेक सोयी सुविधांनी युक्त असे उपकेंद्र असणार आहे.

लवकरच उपकेंद्राचे स्वतंत्र भवनही स्थापित होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असून कविकुलगुरू कालिदास विश्व विद्यालयाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत. कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्ती, वित्त आणि लेख अधिकारी डॉ. रामचंद्र जोशी, गुरुकुलचे संचालक प्रा. पराग जोशी आणि रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांची उपस्थिती होती.

रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने आज शनिवार दि. २५ सप्टेंबर रोजी झाले. उद्घाटनाचा कार्यक्रम दुपारी १२ वाजता मध्यवर्ती एसटी बसस्थानका समोरील अरिहंत संकुलात संपन्न झाला आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री अॅड. अनिल परब आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नाम. उदय सामंत यांची उपस्थिती लाभली आहे.

त्याचप्रमाणे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, , जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि.प. सीईओ डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, राज्य उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक धनराज माने, नगराध्यक्ष बंड्या साळवी,  खास. विनायक राऊत, खास. सुनील तटकरे, आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार हेही उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular