25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeSportsसाताऱ्याची तिरंदाज आदितीचे अद्वितीय यश

साताऱ्याची तिरंदाज आदितीचे अद्वितीय यश

गेल्याच महिन्यात ज्युनियर गटात जगजेती ठरलेली साताऱ्याची तिरंदाज अदिती स्वामी विक्रमाच्या अश्वावर स्वार असून आपल्या शिरपेचात तिने आणखी एक मोठा मानाचा तुरा खोवला. बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात ती विश्वविजेती ठरली. याच गटात भारताच्या ज्योती सुरेखा वेत्रम हिने ब्राँझपदक मिळवून भारताची मक्तेदारी सिद्ध केली. १७ वर्षीय आदितीची ही आणखी एक ऐतिहासिक कामगिरी ठरली. वैयक्तिक गटात जगजेता ठरणारी तो भारताची पहिली महिला तिरंदाज ठरली. कंपाऊंड प्रकाराच्या अंतिम सामन्यात आदितीने दोन वेळच्या जागतिक पदक विजेत्या मेक्सिकोच्या ऑड्या बेकेरा हिचा १४९- १४७ असा पराभव केला.

ज्युनियर आणि सिनियर विश्वविजेतेपद मिळवणारी ती पहिली तिरंदाजही ठरली. १६ वे मानांकन असलेल्या अँड़िया हिने विद्यमान विश्वविजेत्या सारा लोपेझचा उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव केला असल्यामुळे तिच्याकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या, परंतु आदितीचा सामना करणे तिला कठीण झाले. सहाव्या मानांकित आदितीने पहिले तीन बाण जवळपास अचुकतेच्या अगदी जवळ भारत ३०-२९ अशी आघाडी घेतली. त्यानंतर पहिल्या चार राऊंडमधील १२ बाण अचुक लक्ष्यभेद करणारे ठरले. अंतिम राउंडमध्ये आदितीने ९ गुणांचे एक लक्ष्य साध्य केले तेथेच तिचे सुवर्णपदक निश्चित झाले. होते.

आदिती, परनीत कौर आणि ज्योती वेत्रम यांनी शुक्रवारी झालेल्या महिलांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. या प्रकारात उपांत्य फेरीत आदितीचा सामना भारताच्या ज्योती हिच्याशी झाला. सध्या कमालीच्या फॉर्मात असलेल्या आणि अवुक लक्ष्यभेद करत असलेल्या आदितीने हा सामना १४९- १४५ असा जिंकला. आदितीकडून झालेल्या या पराभवातूनही सकारात्मक ऊर्जा घेणाऱ्या ज्योतीने त्यानंतर ब्राँझपदकाच्या लढतीत तुर्कस्तानच्या इपेक तोवर हिच्यावर १५०-१४६ अशी मात केली.

RELATED ARTICLES

Most Popular