27.7 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

कडवईच्या डॉक्टरांची हजारो रुपयांची ऑनलाईन फसवणूक

जिल्ह्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या...

आंबा घाटात झालेल्या ट्रक अपघातात, महिला जागीच ठार

रत्नागिरीला जोडणाऱ्या महामार्गांवर एक दिवस आड अपघातांची...
HomeMaharashtraमहाराष्ट्र केसरी आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे शुक्रवारचे सामने पावसामुळे रद्द

महाराष्ट्र केसरी आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे शुक्रवारचे सामने पावसामुळे रद्द

पावसामुळे विद्युत रोषणाईसह उभारलेला स्पर्धेचा मंडप भिजला आणि कोसळला, त्यासह आखाडय़ाची माती टाकलेली होती तीसुद्धा वाहून गेली.

साताऱ्यामध्ये सध्या कुस्तीच्या स्पर्धा सुरु असून, अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे स्पर्धेवर पाणी फिरले आहे. साताऱ्यातील अवकाळी पावसामुळे शाहू स्टेडियम येथील कुस्ती मैदानाचे मोठे नुकसान झाल्याने महाराष्ट्र केसरी आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे शुक्रवारचे सामने रद्द करण्यात आले आहेत. पावसामुळे शुक्रवारी सायंकाळच्या सत्रातील सामने होऊ शकले नसल्याने खेळाडूंमध्ये काहीशा प्रमाणात नाराजगी पसरली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस प्रा. बाळासाहेब लांडगे यांनी दिली.

संपूर्ण आठवडाभर वातावरणामध्ये लक्षणीय बदल होत आहेत. तापमानात वाढलेल्या उष्म्यामुळे सातारा शहरासह स्पर्धेवरही परिणाम दिसून आला होता. मात्र शुक्रवारी दुपारी अचानकच जोरदार वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली, काही ठिकाणी तर गारा सुद्धा पडल्या. या अवकाळी पावसामुळे स्पर्धेचे किती नुकसान झाले, याची माहिती सायंकाळपर्यंत मिळू शकली नव्हती. पण पावसामुळे विद्युत रोषणाईसह उभारलेला स्पर्धेचा मंडप भिजला आणि कोसळला, त्यासह आखाडय़ाची माती टाकलेली होती तीसुद्धा वाहून गेली. याचप्रमाणे स्पर्धेसाठीच्या गाद्या देखील भिजल्या आणि मैदानावर सगळीकडे पाणीच पाणी झाले होते.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस प्रा. बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले कि, जरी गादीचे आणि मातीच्या आखाडय़ांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी, आम्ही रात्री पुन्हा तयारी करून शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून उर्वरित स्पर्धा पूर्ण करू. पावसामुळे जर आयपीएल  क्रिकेट स्पर्धा रद्द होत नाहीत तर कुस्ती स्पर्धा स्थगित करण्याचे काही कारणच उरत नाही. सातारा तालीम संघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर शनिवारी सकाळपर्यंत सर्व व्यवस्था पूर्ण करून उर्वरित स्पर्धा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,  अशी समन्वयक अमोल बुचडे यांनी माहिती दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular