25.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriगृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची रत्नागिरीला भेट, पोलीस दलाला कौतुकाची थाप

गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची रत्नागिरीला भेट, पोलीस दलाला कौतुकाची थाप

काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा पदग्रहण सोहळा काँग्रेसभवन येथे पार पडला. त्या कार्यक्रम प्रसंगी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी रत्नागिरीला भेट दिली.

काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा पदग्रहण सोहळा काँग्रेसभवन येथे पार पडला. त्या कार्यक्रम प्रसंगी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी रत्नागिरीला भेट दिली. त्याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमावेळी ते म्हणाले, सत्ता ही सापशिडीचा खेळ आहे. ती वरखाली होत असते. याचा अर्थ जे खाली गेले आहेत, ते डावातूनच बाद झाले असे होत नाही. पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने आपल्या कार्याचा वेग ५० टक्के कायम ठेवायला हवा, आणि उर्वरित ५० टक्के वेगाची साथ पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि मंत्र्यांकडून मिळतच असते. अशा पक्ष कार्यातून काँग्रेसला आपण उभारी देऊ या, असे मत काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी नूतन काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या पक्षप्रवेश समारंभावेळी व्यक्त केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस दल अनेक पराक्रमांनी चर्चेत असते. कोविड महामारीचा काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ या काळामध्ये संयम बाळगून अतिशय उत्कृष्ट काम केल्याबद्दल पोलिस दलाचे अभिनंदन करून पोलिस विभागाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. प्रत्यक्ष पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये भेट देऊन सगळा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई तसेच पोलिस विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या सर्व बाबींचा आढावा घेताना, अनेक वर्ष रेंगाळत असलेला  पोलिस मुख्यालय व परिसरातील वसाहतीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यासोबत चर्चा करून येत्या चार महिन्यात त्यावर तोडगा काढून बजेटमध्ये त्याला मंजुरी घेऊ. हा प्रकल्प म्हाडा, पोलिस आणि गृहनिर्माणकडून बांधण्यात येणार असण्याबाबतही निर्णय घेतला जाणार असल्याचे नाम. सतेज पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात येणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी कार्यप्रणाली व यंत्रणा तयार करावी, अशी सूचना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. या आढाव्यामध्ये पोलिस विभागाचे मनुष्यबळ, उपलब्ध साधन सामग्री, सुविधा, राबविलेले उपक्रम, जिल्ह्यातील गुन्ह्यांबाबतची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी संगणकीय सादरीकरणद्वारे दिली.

RELATED ARTICLES

Most Popular