27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeDapoliसॅटेलाईट ट्रान्समीटर लावलेली सावनी कासव झाली वीण, हंगामात दोनवेळा

सॅटेलाईट ट्रान्समीटर लावलेली सावनी कासव झाली वीण, हंगामात दोनवेळा

भारताच्या किनारपट्टीवर सागरी कासव विणीच्या हंगामात ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या एकाहून अधिक वेळा वीण करत असल्याचा हा पहिलाचा पुरावा समोर आला आहे.

दरवर्षी या हंगामाला म्हणजेच साधारण नोव्हेंबर ते मार्च महिन्या दरम्यान ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासवांचा विणीचा हंगाम असतो. कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. मँग्रोव्ह फाउंडेशनने अरबी समुद्रातील या कासवांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी त्यांच्या पाठीवर सॅटेलाईट ट्रान्समीटर लावण्याचा निर्णय घेतला होता. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात गुहागर, वेळास, आंजर्ले  या किनाऱ्याचा मिळून एकूण पाच मादी कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर लावून पुन्हा समुद्रात सोडण्यात आले.

गेल्या महिन्यात वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थांतर्गत आंजर्ले किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर लावलेल्या सावनी नामक मादी कासवाने पुन्हा एकदा अंडी दिली आहेत. शुक्रवार, दि.२५ रोजी पहाटे केळशीच्या किनाऱ्यावर सावनी अंडी घालताना आढळली. भारताच्या किनारपट्टीवर सागरी कासव विणीच्या हंगामात ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या एकाहून अधिक वेळा वीण करत असल्याचा हा पहिलाचा पुरावा समोर आला आहे.

डब्लूआयआय आणि मँग्रोव्ह फाउंडेशनमधील संशोधक गेल्या काही दिवसांपासून या माद्यांच्या समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवून होते. अशातच शुक्रवारी पहाटे सॅटेलाईट ट्रान्समीटर लावलेली एक मादी केळशीच्या किनाऱ्यावर अंडी घालताना कासव मित्र राकेश धोपावकर आणि लहू धोपावकर यांना आढळून आली. त्यांनी लागलीच यासंबंधीची माहिती मँग्रोव्ह फाउंडेशनला दिली.

त्यानुसार, संशोधकांनी लगेचच घटनास्थळी भेट देऊन मादी कासवाची आणि अंड्याची पाहणी केली. एकाच हंगामामध्ये काही कालावधीनंतर दोन वेळा वीण झाल्याचे प्रथमच निदर्शनास आले आहे. परंतु, सॅटेलाईट ट्रान्समीटर लावल्यामुळे या कासव मादीबद्दल लहानातील लहान गोष्ट सुद्धा संशोधकांपर्यंत पोहोचत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular